Husband punished his wife for taking out a five rupee coin from boiling oil; The police were shocked to hear the reason behind the inhuman punishment

उकळत्या तेलातुन नाणे बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते. हात भाजला तर चारित्र्य शुद्ध नाही, असे समजले जाते. असा आघोरी न्यायनिवाडा येथील जात पंचायत करत असते. अशा अमानुष न्यायनिवाड्याला अनुसरूनच या आरोपी पतीने आपलल्या महिलेची चरित्र तपासणी केली.

    नाशिक : पतीने पत्नीला दिली उकळत्या तेलातून पाच रुपयाचे नाणं बाहेर काढण्याची अघोरी शिक्षा दिली आहे. पतीने दिलेल्या या शिक्षेमागचे कारण ऐकून पोलिसही हादरले. नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

    पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. यानंतर तिचा खरे खोटा तपासण्यासाठी त्याने अजब न्याय निवाडा केला.  या महिलेने विरोध करूनही पतीने तीचे चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती केली.

    उकळत्या तेलातुन नाणे बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते. हात भाजला तर चारित्र्य शुद्ध नाही, असे समजले जाते. असा आघोरी न्यायनिवाडा येथील जात पंचायत करत असते. अशा अमानुष न्यायनिवाड्याला अनुसरूनच या आरोपी पतीने आपलल्या महिलेची चरित्र तपासणी केली.

    या आरोपी पतीने तीन दगडांची चुल मांडली. सरपण लावून चुल पेटवली. चुलीवर तेल टाकलेली कढई ठेवली. तेलाला उकळी आल्यावर नवऱ्याने पाच रूपयांचे नाणे त्या तेलात टाकले. यांनतर त्याने ते नाणे रिकाम्या हाताने बाहेर काढण्यास सांगितले.

    या महिलेने उकळत्या तेलात हात घातला व तिचा हात भाजला आहे. या पतीने या घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरलही केला आहे. या घटनेची चौकशी होऊन जात पंचायत विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी होत आहे.