प्रेम संबंधामुळे पतीने केली पत्नीची कोयत्याने हत्या, मुलगी गंभीर जखमी

नाशिक - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांनी जीव गमवला आहे. आणि इतर कोरोनाशी संघर्ष करत आहेत. त्यातच देशात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला लागल्या आहेत. नाशिकमध्ये

 नाशिक – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांनी जीव गमवला आहे. आणि इतर कोरोनाशी संघर्ष करत आहेत. त्यातच देशात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला लागल्या आहेत. नाशिकमध्ये खुनाच्या घटनांनी उच्चाद मांडला आहे. नाशिकमधील जाखोरी गावात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलीलाही गंभीर दुखापत झाली आहे. 

पतीला पत्नी प्रियकरासोबत पळून जाणार असल्याचा संशय आला. प्रचंड राग आल्याने पत्नी झोपेतच असताना पतीने धारदार कोयत्याने गळा चिरला, या घटनेत मुलगी कुशीत झोपल्याने मुलीला गंभीर दुखापत झाली. तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान आरोपी पतीने खुनाची कबूली दिली आहे. पत्नी पळून जाणार असल्याचे समजले, राग अनावर न झाल्याने पत्नीचा खून केला. पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपाल चालु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.