माझी मुख्यमंत्री हाेण्याची सध्या तरी इच्छा नाही पण उद्धव ठाकरेच… अजित पवारांना नेमकं म्हणायचंय तरी काय?

राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार चांगले काम करत आहे, हे जनतेचे पािहले आहे. प्रत्येक पत्रकाराला संपादक व्हायची इच्छा असते, पण ते शक्य नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाचे आहे. सभागृहातील सदस्यांपैकी एकालाच मुख्यमंत्री हाेता येते. आणि तिन्ही पक्षांनी मिळून पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे ठरविले आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या विषयावर बाेलणे टाळले.

    नाशिक : विधीमंडळातील सदस्यांपैकी एकालाच मुख्यमंत्री हाेेता येते. त्यामुळे माझी मुख्यमंत्री हाेण्याची सध्या तरी इच्छा नाही. उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार हे साेनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हाेेण्याचा सध्या तरी िवचार नसल्याचे उपमुख्यमंत्री अिजत पवार यांनी सांगितले.

    राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार चांगले काम करत आहे, हे जनतेचे पािहले आहे. प्रत्येक पत्रकाराला संपादक व्हायची इच्छा असते, पण ते शक्य नाही. तसेच मुख्यमंत्रीपदाचे आहे. सभागृहातील सदस्यांपैकी एकालाच मुख्यमंत्री हाेता येते. आणि तिन्ही पक्षांनी मिळून पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, असे ठरविले आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या विषयावर बाेलणे टाळले.

    विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत विधीमंडळाचे नेते निर्णय घेतील. त्यांचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
    पाेलिस काेठडीत असलेल्या आराेपीने आमचे नाव घेतले म्हणून आमच्या सीबीआय चाैकशीचा ठराव भाजपाने पक्षाच्या बैठकीत केला. आता ज्या व्यक्तीने पाेलिस खाते बदनाम केले त्याच्यावर विश्वास ठेवायचा की आमच्यावर हा त्यांचा प्रश्न आहे. पण सध्या चंद्रकांत पाटील असाे अथवा भाजपाचे इतर नेते असाेत. सर्वच वैफल्यग्रस्त झाल्याने काही ना काही उकरून काढण्याचा प्रयत्न करत असतात.

    पक्षाच्या बैठकीत सीबीआय चाैकशीचा ठराव करण्याची ही राजकारणाच्या इतिहासात कदाचित पहिलीच वेळ असावी. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.