पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ आमच्याशी; तुषार भोसलेंचा सरकारच्या निर्णयाला विरोध

वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील, असे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

    नाशिक : राज्य सरकारच्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीच्या निर्णयाचा विरोध केला. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील, असे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

    अन्यथा रस्त्यावर पालख्या उतरतील

    भोसले म्हणाले की, यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा भाजपप्रणित आध्यात्मिक आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.. ते म्हणाले की, मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे.

    वारकरी घेणार राज्यपालांची भेट

    काही वारकरी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. कुंभमेळ्याचे शेवटचे शाही स्नान झाल्यामुळे वारीला एवढी गर्दी होणार नाही. पालखी सोहळ्यात गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी वारकरी संप्रदाय तयार होता. मात्र, सरकारने परस्पर निर्णय घेतला. या निर्णयाला कोणत्याही वारकऱ्याने पाठिंबा दिला नसल्याचे तुषार भोसले यांनी सांगितले