इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण; हिना पांचाळसह २५ संशयितांना जामीन मंजूर

इगतपुरीतील स्काय ताज व्हीला व ताज व्हीलामध्ये अंमली पदार्थ्यांच्या सेवनासह हवाईयन रेव्ह पार्टी चालू असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २९ संशयितांना अटक केली. ड्रग्ज विक्रीप्रकरणी पोलिसांनी मुंबईतून नायझेरियन गुन्हेगार पीटर उमाही यास अटक केली. पोलिसांनी ७ जुलै रोजी हिना पांचाळसह सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

    नाशिक : गेल्या महिन्यात ग्रामीण पोलीसानी इगतपुरीत रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.१९) बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री हिना पांचाळसह 25 संशयिताना जामीन मंजूर केला. पियुष सेठिया, हर्ष शैलेश शहा यांच्याकडे अमली पदार्थ
    मिळून आल्याने न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे.

    इगतपुरीतील स्काय ताज व्हीला व ताज व्हीलामध्ये अंमली पदार्थ्यांच्या सेवनासह हवाईयन रेव्ह पार्टी चालू असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २९ संशयितांना अटक केली. ड्रग्ज विक्रीप्रकरणी पोलिसांनी मुंबईतून नायझेरियन गुन्हेगार पीटर उमाही यास अटक केली. पोलिसांनी ७ जुलै रोजी हिना पांचाळसह सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

    पोलिसांनी तपासणीसाठी पाठवलेल्या पाण्याच्या नमुन्यामध्ये कोकेन असल्याचा समोर आले आहे. रेव्ह पार्टी करताना आणि अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या हिना पांचाळसह संशयितांनी जामीन अर्जासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. या अर्जांवर युक्तिवाद पूर्ण झाल्याने सोमवारी न्यायालयाने हिना पांचाळसह २५ संशयितांना जामीन मंजूर केला.