बनावट नाेटा चलनात; महिला डाॅक्टरसह पाच जण अटकेत

१२ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गाेपनीय माहितीद्वारे लासलगाव येथील मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ दोन्ही रा. बोराडे हॉस्पिटलजवळ लासलगाव व विठ्ठल चपलाल नाबरीया, रा कृषीनगर, कोटमगाव रोड लासलगाव ता. निफाड यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आमचा मित्र रवींद्र हिरामण राऊत, रा. स्मारक नगर, पेठ व विनोद मोहनभाई पटेल (रा. पंचवटी, नाशिक) हे आम्हाला सायंकाळी बनावट ५०० दराच्या चलनी नोटा देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती.

    लासलगाव : शहर व परिसरात बनावट नाेटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका डाॅक्टर महिलेसह पाच जणांच्या टाेळीला पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. या टाेळीकहून एक लाख ४५ हजार रुपयांच्या पाचशेच्या एकूण २९१ नाेटाही जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    टाेेळी सक्रीय
    आशिया खंडातील कांद्याची अग्रसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे कोट्यावधीची कांदा, धान्य व अन्य इतर व्यवसायात उलाढाल होत असते. या गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा वितरण करण्यासाठी एका डॉक्टर महिलेसह पाच जणांची टोळी सक्रिय झाली होती. या टोळीच्या मुसक्या लासलगाव पोलिसांनी आवळल्या आहेत.

    पाेलीसांना मिळाली मािहती
    १२ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गाेपनीय माहितीद्वारे लासलगाव येथील मोहन बाबुराव पाटील व डॉ. प्रतिभा बाबुराव घायाळ दोन्ही रा. बोराडे हॉस्पिटलजवळ लासलगाव व विठ्ठल चपलाल नाबरीया, रा कृषीनगर, कोटमगाव रोड लासलगाव ता. निफाड यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आमचा मित्र रवींद्र हिरामण राऊत, रा. स्मारक नगर, पेठ व विनोद मोहनभाई पटेल (रा. पंचवटी, नाशिक) हे आम्हाला सायंकाळी बनावट ५०० दराच्या चलनी नोटा देणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हाेती.

    कारवाईत यांचा सहभाग
    या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सपोउनि राजेंद्र अहिरे पोलीस हवालदार बाळू सांगळे, पोलीस नाईक कैलास महाजन, योगेश शिंदे, संदीप शिंदे, पोका प्रदीप आजगे, गणेश बागूल, कैलास मानकर, सागर आरोटे, देविदास पानसरे, महिला पोलिस शिपाई मनीषा शिंदे यांचे पथक तयार करून या पथकाने येवलारोड िवंचूर येथे सापळा रचून मोहन पाटील, डॉ. प्रतिभा घायाळ, िवठ्ठल नावरीया यांना बनावट ५०० दराच्या २९१ नोटा देण्यासाठी आलेले रवींद्र हिरामण राऊत (रा. स्मारक नगर) व विनोद मोहनभाई पटेल (रा. चाणक्य बिल्डींग, पंचवटी) हे त्यांच्याकडील इटीऑस कार क्रमांक एमएच ३ सीएच ३७६२ यामध्ये आले असता पंचासमक्ष छापा टाकून त्यांच्याकडून ५०० दराच्या बनावट २९१ नोटा व इटीऑस कार किमंत अंदाजे ४,०,००० रु जप्त करण्यात आली,

    यांचे मार्गदर्शन
    या इसमांनी भारतीय चलनातील ५०० दराच्या बनावट २९१ नोटा व्यवहारात आण्ण्यासाठी कब्जात बाळगल्या व प्रयत्न केला म्हणून पोकों प्रदिप आजगे यांचे फिर्यादीवरुन लासलगाव पोलीस स्टेशनला वरील इसमांविरुध्द भादंवि कलम ४८९ क.ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे.