onion farm affected due to rain

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीतील सुमारे ६५ गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने कांदा या मुख्य पिकाचे मोठे नुकसान होणार आहे.

लासलगाव : लासलगावसह (Lasalgaon) परिसरात मंगळवारी उशिरा रात्री १० वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने (heavy rain) दोन तास जोरदार बॅटिंग केल्याने कांद्यासह (Onion) शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या चार-पाच दिवसांपासून कधी सकाळी तर कधी दुपारी तर संध्याकाळी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने लासलगाव शहरातून जाणाऱ्या शिवनदी ला दुसऱ्यांदा पूर आले आहे

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर असलेली बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीतील सुमारे ६५ गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने कांदा या मुख्य पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. सततच्या पावसामुळे कांदा, सोयाबीन, टोमॅटो मिरची, भुईमूग आदी शेती पिके शेतातच सडून जाण्याच्या भीतीने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे या अतिपावसामुळे खरिपाच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याने तातडीने पंचनामे करून केंद्र व राज्य सरकारने भरघोस आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे