लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात साडेबाराशे रुपयांची वाढ

लासलगाव : राज्यासह मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मंदावली आहे तर दिवाळी, साप्ताहिक सुट्टीनिमित्त गुरुवार रोजी दिनांक १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर असे आठ दिवस बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे कोसळणार्‍या कांद्याच्या बाजार भावाला सोमवारी लासलगाव बाजार समितीत ब्रेक लागला आहे. गेल्या आठवड्यातील शनिवारच्या तुलनेत सोमवारी उन्हाळ कांद्याच्या सर्वसाधारण बाजारभावात १ हजार २५० रुपयांची तर नवीन लाल कांद्याच्या बाजारभावात ५५० रुपयांची प्रति क्विंटल मागे दिवाळीच्या तोंडावर मोठी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लासलगाव बाजार समितीत ४४७ वाहनातून ५ हजार १०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. याला कमाल ४ हजार ९७५ रुपये, सर्वसाधारण ४ हजार ६५१ रुपये तर किमान १ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलला मिळाला तसेच १३ वाहनातून ११० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली याला कमाल ४ हजार ३०० रुपये, सर्वसाधारण ३ हजार १०० रुपये तर किमान २ हजार ००१ रुपये प्रतिक्विंटलला मिळाला आहे.

-काेट्यवधींचा फटका
कांद्याचे वाढते बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी इजिप्त, इराण आणि तुर्की या परदेशातून कांदा आयात केला गेला होतात तसेच नवीन लाल कांद्याची ही आवक सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांमध्ये बाजार समित्यांमध्ये वाढल्यामुळे गेल्या आठवड्यात सोमवार ते शनिवारपर्यंत ह्या सात दिवसात टप्प्याटप्प्याने कांद्याच्या बाजारभावात बावीस रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला होता त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादकांना शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते मात्र सोमवारी एकाच दिवसात १२५० रुपयांची सर्वसाधारण दर वाढ झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.

-अायात कांद्याच्या मागणीत घट
पिंपळगाव येथील एका व्यापाऱ्याने तुर्की येथून शंभर टन कांदा आयात केला होता त्यातील काही कांदा हा पिंपळगाव बसवंत बाजार समितीत विक्री केला असता 1381 रुपये इतके प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला आहे या कांद्याची प्रतवारी खालावली असून आणि हा कांदा बेचव आहे त्यामुळे परदेशी आयात होणाऱ्या कांद्याच्या मागणीत ही घट झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

-कांदा उत्पादकांचा िवचार करावा
दिवाळी कशी साजरी करावी आणि कुटुंब कसे चालवावे असा मोठा प्रश्न आमच्या कांदा उत्पादकांना समोर उभा राहिला होता मात्र कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने अंशता दिलासा मिळाला आहे फारच थोड्या शेतकऱ्यांचा जवळ उन्हाळ कांदा शिल्लक आहे तर नवीन लाल कांद्याची ही पीक वाया गेले आहे त्यामुळे केंद्र सरकारने आमच्या कांदा उत्पादकांचाही आता विचार करावा.

-कांद्याची अायात थांबवावी
बिहार निवडणुका संपल्या आहे आज मतमोजणी होत निकाल हाती येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिवाळीच्या तोंडावर दिलासा देण्यासाठी परदेशी कांद्याची आयात थांबवावी आणि कांदा उत्पादकांचे अति पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कांद्यावरील सर्व निर्बंध ही हटवावेत, अशी मागणी शेतकरी संघर्ष संघटनेचे नाशिक जिल्हा प्रमुख निवृत्ती न्याहारकर यांनी केली अाहे.