नाशिकमध्ये २४ तासात ३८८ कोरोनाबाधितांची नोंद तर १० जणांची मृत्यू

  • नाशिकमध्ये सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे अनेक कामगारांची तसेच बाहेरील नागरिक घरी परतल्याने संसर्ग वाढू लागला आहे. नाशिकमध्ये कोरोना आकडा वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. नवनवीन उपाययोजना वापरण्यात येत आहेत. तसेच यंत्रणांची चिंता वाढली आहे.

नाशिक – नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. नाशिकमधील मालेगावात पहिला कोरोनाने धुमाकूळ घातला होता. परंतु मालेगाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना नाशिकमधील कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. बुधवारी दि १५ जुलैला नाशिक मध्ये ३८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

नाशिकमध्ये सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे अनेक कामगारांची तसेच बाहेरील नागरिक घरी परतल्याने संसर्ग वाढू लागला आहे. नाशिकमध्ये कोरोना आकडा वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. नवनवीन उपाययोजना वापरण्यात येत आहेत. तसेच यंत्रणांची चिंता वाढली आहे.