नारायण राणे यांच्या निषेधार्थ सटाण्यात शिवसेनेने पुतळा जाळून रास्तारोको करीत दिले राणे कुटुंबाला खुले आव्हान

मंगळवारी(दि.२४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानकासमोर शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे,शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांनी अचानक रास्ता रोको आंदोलन छेडले.यावेळी शिवसैनिकांनी राणेविरोधी घोषणाबाजी करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळून रास्ता रोको आंदोलन करतानाच बागलाणच्या शिवसैनिकांनी राणे कुटुंबाला खुले आव्हान दिले आहे.

    मंगळवारी (दि.२४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानकासमोर शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांनी अचानक रास्ता रोको आंदोलन छेडले.यावेळी शिवसैनिकांनी राणेविरोधी घोषणाबाजी करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

    पोलिसांना आंदोलनाबाबत समजतात घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला.यावेळी बोलतांना सटाणा शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी राणेंचा खरपूस समाचार घेतांना शिवसैनिकांच्या वतीने खुले आव्हान दिले.