लासलगाव येथील ९ कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

लासलगाव : घाऊक बाजारात कांदा दराने ४ हजार ८०० रूपयांचा दर ओलांडताच कांदा भावात सुरू असणारी तेजी लक्षात घेऊन प्राप्तिकर विभागाने आपला मोर्चा या क्षेत्रातील कांदा व्यापाऱ्यांकडे वळविला आहे. येथील मुख्य बाजार आवारावर कांद्याचे दराने तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केले होती. दुसऱ्या टप्प्यात कांदा दराने ४ हजार८०० रुपयांचा दर ओलांडल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने ९ कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे

किरकोळ दरात कांद्याने ५० रुपये किलोचा दर ओलांडताच बुधवारी लासलगाव येथील ९ कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. दिवसभर चाललेल्या या कार्यवाहीत नेमके काय निष्पन्न झाले, त्याची स्पष्टता केली गेली नाही. या प्रकाराने कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लासलगांव येथील कांदा व्यापरयावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड़ी टाकल्या असून येथील ९ कांदा व्यापरयाच्या कार्यलय, गोडावून तपासणी सुरु आहे. कांद्याचे वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकार ने कांदा निर्यातीवर निर्बंध लादले असून देखील कांदा दर आटोक्यात येत नसल्याने आता कांदा व्यापार्यावर धाड़ सत्र टाकले जात आहे.यामुळे व्यापार्यामध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

प्राप्तीकर विभागाच्या या विशेष पथकाने लासलगाव येथील ९ मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यासह दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच मध्य प्रदेशातील नवीन लाल कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने चाळीत साठविलेल्या शिल्लक असलेल्या उन्हाळ कांद्याची मागणी देशांतर्गत वाढली आहे. देशभरात कांद्याचा साठा संपूष्टात आला आहे. त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापाºयांकडून अतिरिक्त साठा केला आहे की काय, याची पडताळणी करण्यासाठी ही पथके आल्याचे समजते. लासलगाव परिसरातल्या मुख्य व्यापा-यांवर आयकर विभागानं लक्ष केंद्रित केलंय. हे व्यापारी आधीपासूनच आयकर विभागाच्या रडारवर होते.मागील वर्षी अशीच कांद्याचे भाव वाढल्याने लासलगाव येथील व्यापाऱ्यांवर छापे मारण्यात आले होते.

२० वर्षात १७ धाड़ी
लासलगांव येथील कांदा निर्यातदार व्यापार्याकडे १९९८ पासुन अद्यापपर्यन्त १७ वेळ धाडी पडल्या आहे.