काेराेनाचा वाढता प्रादूर्भाव ; मनमाडला तीन दिवस जनता कर्फ्यू

बंदच्या कालावधीमध्ये शहरातील फक्त औषधांची दुकाने (मेडीकल स्टोअर्स) हे नियमित सुरु असतील व दुध विक्री ही फक्त सकाळी ७ ते ९ व सायं.७ ते ९ या कालावधीत सुरु असेल. या व्यतिरीक्त मनमाड शहरातील इतर संपूर्ण दुकाने बंद राहतील.

    मनमाड : काेराेेनाच्या वाढत्या प्रादूर्भावाने प्रशासन सतर्क झाले असून, हा संसर्ग राेखण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न सुरू झाले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड येथे शनिवार ते साेमवार तीन दिवस जनता कर्फ्यूची घाेषणा करण्यात आली आहे.

    बंदच्या कालावधीमध्ये शहरातील फक्त औषधांची दुकाने (मेडीकल स्टोअर्स) हे नियमित सुरु असतील व दुध विक्री ही फक्त सकाळी ७ ते ९ व सायं.७ ते ९ या कालावधीत सुरु असेल.
    या व्यतिरीक्त मनमाड शहरातील इतर संपूर्ण दुकाने बंद राहतील. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व बंददरम्यान शहरातील सर्व नागरीक व व्यापारी वर्गाने सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा पद्मावती जगन्नाथ धात्रक यांनी केले आहे.

    ते पुढे म्हणाले की, तालुक्याचे आमदार सुहासअण्णा कांदे यांचे मार्गदर्शनानुसार काेराेेनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने मनमाड नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी विजयकुमार मंडे यांची गुरुवारी सायं. ४ वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार शनिवार व रविवार हे दोन दिवस बंद वार असतील तर सोमवार २२ मार्च हा दिवस जनता कप! म्हणून मनमाड शहर बंद घोषित करणेबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

    तसेच सदर कालावधीमध्ये उपाययोजना म्हणून मनमाड नगरपरिषदेमार्फत विविध पथकांची नियुक्ती केलेली असून, कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम आयसोलेट केलेले आहे. व अशा प्रकारचे बाधीत झालेले रुग्ण शहरात इतरत्र फिरतांना आदळल्यास त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना सक्ती कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात येईल. तसेच कोरोना बाधीत रुग्ण शहरात फिरतांना आदळल्यास ग्रामीण रुग्णालय अथवा मनमाड नगरपरिषद कार्यालयाशी नागरीकांनी संपर्क साधावा. अशा नागरिकांच्या नावांची गसता पाळण्यात येईल. तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही धात्रक यांनी केले.