लाॅन्समध्येच सुरू हाेता गाेरखधंदा! चांदाेरीत एक काेटींची बनावट दारू जप्त

नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स असून, यावर अवैद्य देशी दारू तयार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने ११ ऑक्टोंबर रोजी सोमवारी रात्री उशीरा अकरा वाजता छापा टाकला.

    लासलगाव : साखरपुडा असो किंवा लग्नकार्य डोळ्यासमोर येते ते मंगल कार्यालय, लॉन्स मात्र या शुभकार्याच्या याठिकाणी देशी बनावट दारूचा अवैद्य कारखाना सुरू असेल तर आपला नक्कीच विश्वास बसणार नाही. पण अशी घटना घडली आहे ती नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावात. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे.

    आर्थिक अडचण
    कोरोनाचा प्रादूर्भाव गेल्यावर्षी मार्च महिन्यात सुरु झाला. त्याचा थेट परिणाम लग्न समारंभ यावर पाहायला मिळाले गर्दी वाढू कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, म्हणून साखरपुडा लग्नकार्यावर बंदी आल्याने मंगल कार्यलय, लॉन्सचे मेंटनस काढणे मुश्कील झाल्याने येवला तालुक्‍यात कांदा साठवण्यासाठी मंगल कार्यालय भाड्याने दिल्याचे आपण मध्यंतरी बघितले. मात्र निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चक्क दारू बनवण्यासाठी लॉन्स दिल्याचे समोर आले आहे.

    मुद्देमाल हस्तगत
    नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स असून, यावर अवैद्य देशी दारू तयार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने ११ ऑक्टोंबर रोजी सोमवारी रात्री उशीरा अकरा वाजता छापा टाकला. यावेळी संजय मल्हारी दाते (४७, रा. गोंदेगाव) हा तेथे आढळला. त्याच्या ताब्यात बनावट देशी दारूचे अंदाजे १५०० ते २००० बॉक्स, अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार देशी दारू रिकाम्या बाटल्या, २० हजार लिटर स्पिरिट, दोनशे लीटरचे ९० ते १०० बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे पाच हजार ते १० हजार, देशी दारू बनवण्याचे साहित्य ५ पाण्याच्या टाक्या, एक मालट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाईमुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांचे या कारवाईने धाबे दणाणले आहे. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.