संकटकाळात जगदीश पाटील ठरले संकटमाेचक ; लसीकरणासाठी पुढाकार

नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिंडोरी रोडवरील मायको दवाखाना खूप चकरा मारल्या. पण कोणीच दाद देत नव्हते. ही गोष्ट नगरसेवक जगदिश पाटील यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी व सामजिक कार्यकर्ते शंकर हिरे यांनी तब्बल साडे तीन तास ठिय्या दिला. त्यामुळे अखेर सर्वप्रथम प्रभागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले.

  नाशिक : काेराेनाकाळात शहरातील जनता मेटाकुटीस आली हाेती. राेजचे वाढते रुग्ण, त्यातच औषधे, ऑक्सिजन, इंजेक्शन यांची कमतरता. कुणाकडे मदत मागावी, या विवंचनेत नागरिक हाेते. अनेक भागात तर लाेकप्रतिनिधीही भेटत नव्हते. परंतु मतदार राजा या विवंचनेत असताना भाजपाचे गटनेते, नगरसेवक जगदीश पाटील यांनी मात्र आपल्या मतदारांची सेवा, हेच कर्तव्य मानून त्यांना शक्य तितकी मदत केली. आता मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी थेट आपली गाडी ने-आण करण्यासाठी ठेवून आदर्श घडवला आहे.

  ज्येष्ठांना दिलासा
  निवडणुकीच्या काळात तर सर्वच जण मतदार राजाची सेवा करण्यासाठी उत्सुक असतात. मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी छुप्या मार्गाने वाहतूक केली जाते. पण अडचणीच्या काळात कुणीही दिसत नसल्याने कुठे हरवले ते गाडीवाले? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला हाेता. काेराेनासारख्या अडचणीच्या काळात मात्र हा राजाच वणवण भटकत हाेता. मात्र जगदीश पाटील यांनी मतदारसंघात ‘लसीकरणासाठी नगरसेवकाची गाडी ज्येष्ठांच्या दारी’ उपक्रम राबवून ज्येष्ठांना दिलासा दिला आहे.

  लाॅकडाऊनमुळे अडचणी
  काेराेनाचा प्रादूर्भाव वाढल्याने जिल्ह्यात निर्बंध आहेत. त्यामुळे सार्वजिनक वाहतूक बऱ्यापैकी बंद अाहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर येण्यासाठी अडचणी येत हाेेत्या. काही ज्येष्ठ नागरिकांना शारीिरक समस्या आहेत तर काही ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात. त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर जाणे शक्य हाेत नव्हते. मतदारसंघातील या अडचणीची मािहती मिळताच ज्येष्ठांच्या साेयीसाठी जगदीश पाटील यांनी पुढाकार घेऊन अापली गाडी देत ज्येष्ठांचे लसीकरण सुरू केले आहे.

  लसीकरणासाठी लढा
  नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिंडोरी रोडवरील मायको दवाखाना खूप चकरा मारल्या. पण कोणीच दाद देत नव्हते. ही गोष्ट नगरसेवक जगदिश पाटील यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी व सामजिक कार्यकर्ते शंकर हिरे यांनी तब्बल साडे तीन तास ठिय्या दिला. त्यामुळे अखेर सर्वप्रथम प्रभागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले.

  ऑनलाईन नाेंदणी
  प्रभागातील तारवालानगर, तलाठी कॉलनी. लामखेडे मळा, लोकसहकारनगर, महालक्ष्मी टॉकीज पाठीमागील परिसरातील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी पाटील ऑनलाइन नोंदणी करून घेतात. त्यांना लसीकरण केंद्रावर न्यायचे, लसीकरण पूर्ण करायचे आणि पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप सोडायचे, असा दिनक्रम सध्या पाटील यांचा सुरू आहे.

  जनसेवेचा वसा घेतला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विकासकामे महत्वाची नसून घरच्याप्रमाणे जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणे कर्तव्य समजतो. निवडणुकांच्या वेळी जसे वाहने पाठवून ज्येष्ठ नागरिकांकडून मतदान करवून घेतले जाते. त्याचप्रमाणे सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहने पाठवून त्यांचे लसीकरण करून पुन्हा घरी सुखरूप सोडवणे, माझे कर्तव्यच आहे. ही एक सेवा असून, ती माझ्या हातून घडते, हे मी माझे भाग्य समजतो.

  - जगदीश पाटील, भाजपा गटनेता तथा नगरसेवक