जितेंद्र आव्हाड ईडीच्या यादीतील 12वे खेळाडू; भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा सुरू होताच भाजपा नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) ‘अॅक्टीव्ह’ झाले असून त्यांनी बुधवारी नाशिकचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांच्या मालमत्तांची पाहणी केली. त्यानंतर पत्रपरिषदेत त्यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तेबाबतही खळबळजनक दावा केला तर ईडीच्या यादीत 12व्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांचे नाव असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली.

  नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा सुरू होताच भाजपा नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) ‘अॅक्टीव्ह’ झाले असून त्यांनी बुधवारी नाशिकचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांच्या मालमत्तांची पाहणी केली. त्यानंतर पत्रपरिषदेत त्यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तेबाबतही खळबळजनक दावा केला तर ईडीच्या यादीत 12व्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांचे नाव असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली.

  गवळींनी 70 कोटींचा ट्रस्ट पीएच्या नावे केला

  ईडीने शिवसेना खासदार भावना गवळी यांची चौकशी सुरू केली असतानाच सोमय्या यांनी गवळी यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. गवळी यांनी 70 कोटींचा ट्रस्ट चुकीच्या पद्धतीने त्यांच्या पीएच्या नावावर केली, असा आरोप त्यांनी केला. गवळी यांनी त्यांच्या महिला उत्कर्ष ट्रस्टचं परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केले. या ट्रस्टमध्ये एकूण ७० कोटींची संपत्ती होती. ती सर्व गवळी यांनी त्यांचा पीए सईद खान याच्या नावावर केली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

  मुख्यमंत्री ठाकरे, पवार यांना आव्हान

  सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने कारवाई केल्याचा दावा केला होता. तथापि, भुजबळ यांनी दावा फेटाळला होता. त्यानंतर बुधवारी सोमय्या यांनी भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भुजबळांच्या मालमत्तांची माहिती जाहीर करण्याचे थेट आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आहे. भुजबळ ज्या नऊ मजली इमारतीत राहतात, त्या इमारतीशी संबंध काय? कागदावर या नऊ मजली महालाचा मालक परवेझ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. परवेझ कन्स्ट्रक्शनशी आपला संबंध काय? असा सवाल त्यांनी केला.

  महिला उत्कर्ष ट्रस्टचे परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरीत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांवर सह्या खोट्या आहेत. यात फसणूक झाली आहे. यामध्ये पुसद नागरी बँकेने ना हरकत प्रमाणपत्र भावना गवळी यांना दिलेले नाही. हे परिवर्तन खोट्या पद्धतीने केल्याचे धर्मदाय आयुक्तांनी देखील सांगितले आहे.

  - किरीट सोमय्या, भाजपा नेते