राम मंदिर भूमिपूजनावर जितेंद्र आव्हाड यांचे खरमरीत वक्तव्य, भाजपवर ओढले ताशेरे

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर भाजपावर राममंदिराच्या मुद्द्यावरून चांगलेच खडेबोल उच्चारले आहेत. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, श्री रामाचा सातबारा कोणाच्या खासगी नावावर नाही.

नाशिक : नाशिकमध्ये सिडको परिसरात तयार करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचं जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते उद्गाटन करण्यात आले. हे कोविड रुग्णालय शिवसेनेच्या पुढाकारानं उभारण्यात आले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आयोजित राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर खरमरीत टीका केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर भाजपावर राममंदिराच्या मुद्द्यावरून चांगलेच खडेबोल उच्चारले आहेत. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, श्री रामाचा सातबारा कोणाच्या खासगी नावावर नाही. महाराष्ट्र कोरोनामुक्त होवो अशी प्रार्थना श्रीराम चरणी केली. तसेच प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या नाशिक भूमिचा मी सुपुत्र आहे. माझा जन्मदेखील नाशिकचा असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

गेले ४० वर्षे भाजपने रामाच्या नावावर राजकारण केले आहे. हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. राम नाव घेऊन त्यांणी पाणी विकले, विटा विकल्या तसेच सत्ता काबीज करण्यासाठी जे करता येईल ते केले. असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे. श्रीराम हे कोणाच्या सातबारावर नाही. किंवा तो साताबारा कोणाच्या मालकीचा नाही. त्यामुळे राम नावावर कोणी राजकारण करु नका. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.