नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता

मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे.

  खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक : प्राचीन मराठा काळापासून, नाशिकची ग्रामदेवता म्हणून कालीचे हे बाल रूप श्री कालिका देवी मंदिरात विराजमान आहे. त्या वेळी हे मंदिर प्रथम जंगलात स्थापन झाले होते अहिल्याबाई होळकरांनी १७०५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी हे मंदिर १०×१० चौरस फूट आणि विहिरीसह १५ फूट उंच होते. भूतकाळात हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात शहराच्या वाढीसह आले आणि बघता बघता आज हे मंदिर लोकांमध्ये एक प्रमुख श्रद्धास्थान बनले आहे. त्यामुळे हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात.

  जागृत देवस्थान
  नाशिकच्या वैभवातील एक मानाचे ग्रामदैवत श्रीकालिका माता जुन्या नाशिकच्या जुने आग्रारोड नजीक असलेले कालिका मातेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे स्थानचं! नवरात्रीच्या दिवसांत भाविकांची पाऊले दूरून कालिकेच्या मंदिराकडेच जातात. अश्या या जागृत देवस्थानाची ख्याती आहे. अत्यंत जागृत व नवसाला पावणारे देवस्थान नाशिक शहरात फार पुरातन काळापासून म्हणजे मराठ्यांच्या राज्यात शहराच्या दक्षिण टोकाला जंगलामध्ये, रस्ताने जातांना वटवृक्षाच्या दुतर्फा रांगा व हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यांत, रमणीय अशा जागेत लहानसे विटांचे बांधलेले श्री कालिका देवीचे मंदिर होते. ते अत्यंत जागृत व नवसाला पावणारे म्हणुन प्रसिध्द होते. त्याचा अनुभव बर्‍याच सात्विक लोकांनी घेतलेला आहे. इ.स.१७०५ च्या सुमारास श्री कालिका मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत आहिल्याबाई होळकर यांनी केला. पुर्वीचे मंदिर १० बाय १० क्षेत्रफळाचे व १५ फुट उंच असे दगडी स्वरुपाचे होते व त्या ठिकाणी बारवही (विहिर) बांधण्यात आला होता.

  अशी आहे रचना
  मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.

  जनसहभागातून जीर्णाेद्धार
  मंदिर विस्तारासाठी जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना भव्य प्रवेशदारे आणि संपूर्ण परिसराला फरशी लावण्यात आली आहे. नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती घडविल्या सुरुवातीला हे फक्त कालिका मातेचे मंदिर होते. कालांतराने तिवारी, मेहेर, वाजे या देवीभक्तांनी महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या मूर्ती मंदिराला भेट दिल्या. त्यानंतर थेट जयपूरहून देवींच्या तिन्ही मूर्ती तयार करून, त्यांची यथासांग प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.