दक्षिण आफ्रिकेतील शांतीसेनेत खामखेड्याचा जवान

संदीप १९९९ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. बेळगांव कर्नाटक येथे सैनिक पूर्व प्रशिक्षणात उत्तम प्रशिक्षण घेत त्यांनी आपली छाप पाडली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटमध्ये करण्यात आली. या बटालियन अंतर्गत सर्वप्रथम अंदमान निकोबार येथे ते सेवा बजावू लागले. त्यांतर जम्मू काश्मीर येथील लेहलडाख, नंतर दिल्ली, जम्मू-काश्मीरमधील उरी, त्यानंतर गुजरात मधील गांधीनगर, अरुणाचल प्रदेशातील तवांग, पंजाब येथील फिरोजपूर व सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेवर त्यांची नेमणूक आहे.

    देवळा : खामखेडा तालुका देवळा येथील संदीप खंडू वाघ या जवानाची दक्षिण आफ्रिकेत शांततेसाठी कार्य करत असलेल्या सैन्य दलाच्या शांती सेनेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल खामखेडा गाव व परिसरात आनंद व्यक्त केला जात असून संदीप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    २२ वर्षे सेवा
    संदीप १९९९ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. बेळगांव कर्नाटक येथे सैनिक पूर्व प्रशिक्षणात उत्तम प्रशिक्षण घेत त्यांनी आपली छाप पाडली होती. त्यानंतर त्यांची नियुक्ती मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटमध्ये करण्यात आली. या बटालियन अंतर्गत सर्वप्रथम अंदमान निकोबार येथे ते सेवा बजावू लागले. त्यांतर जम्मू काश्मीर येथील लेहलडाख, नंतर दिल्ली, जम्मू-काश्मीरमधील उरी, त्यानंतर गुजरात मधील गांधीनगर, अरुणाचल प्रदेशातील तवांग, पंजाब येथील फिरोजपूर व सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेवर त्यांची नेमणूक आहे. आज पावेतो त्यांनी २२ वर्ष सेवा बजावली आहे.

    अशी हाेते निवड
    नुकत्याच एक वर्षांच्या कालावधीसाठी भारताच्या वतीने दक्षिण आफ्रिकेतील पाठवण्यात आलेल्या शांती सेनेत त्यांची निवड झाली. दक्षिण आफ्रिका येथिल डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ काॅगों या ठिकाणी सध्या या सेनेचे वास्तव्य आहे. लष्करातील निवडक सैनिकांना येथे जाण्याची संधी मिळते. अविरतपणे भारतीय सेनेची सेवा करणाऱ्या व उत्तम प्रदर्शन करणाऱ्या सैनिकांची शांती सेनेत निवड होत असते. देवळा तालुक्यातून पहिल्याच वेळेस सैनिक शांती सेनेत जाण्याचा मान संदीप वाघ यांना मिळाला आहे. महिनाभरापूर्वी संदीप या ठिकाणी पोहचले आहेत.