नवरात्र उत्सवात कोटमगावचे मंदिर बंदच रहाणार : ग्रामपंचायत, तहसिल, ट्रस्ट पोलीसांचा निर्णय  

कोटमगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत यावर्षीही मागील वर्षाप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा ठराव ट्रस्टला दिला होता. तर ट्रस्टनेही याबाबत तहसीलदारांना पत्र देऊन निर्णय घेण्याची विनंती केली होती.

  येवला : तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी कोटमगाव येथील जगदंबा मंदिर नवरात्र उत्सवाच्या काळात बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर ट्रस्ट व प्रशासनाने घेतला आहे.भाविकांनी जगदंबा मातेच्या दर्शनासाठी कोटमगाव येथे येऊ नये, असे आवाहन जगदंबा ट्रस्ट कोटमगाव ग्रामपंचायत व प्रशासनाने केले आहे.
  तहसीलदारांकडे बैठक
  कोटमगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत यावर्षीही मागील वर्षाप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा ठराव ट्रस्टला दिला होता. तर ट्रस्टनेही याबाबत तहसीलदारांना पत्र देऊन निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार तहसिल कार्यालयात तहसीलदार प्रमोद हिले यांनी बैठक बोलाविली होती.
  यांचा सहभाग
  या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमाने, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे उपसि्थत हाेते. बैठकीत तहसीलदार हिले यांना मंदिर ट्रस्टने पत्र देत मुख्यमंत्र्यांनी मंदिर खुले ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला असून, ग्रामपंचायतीने मंदिर बंद ठेवण्याचा केलेला ठरावानुसार हाच निर्णय योग्य असल्याचे सांगत आपल्या तालुक्यात आजही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याचे सांगितले.
  कमर्चा्रयांची कमतरता
  आज शंभराच्यावर कोरोनारुग्ण असून नवरात्रोत्सवात मंदिर खुले ठेवल्यास भाविकांची गर्दी होऊन रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यातच कोटमगावची यात्रा ही राज्यभरात प्रसिद्ध असून याठिकाणी राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्ट व प्रशासनाकडे नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी कुमक नसल्याने मंदिर बंद ठेवणे हाच पर्याय होऊ शकतो, असे मत तहसीलदार प्रमोद हिले यांनी मांडले.
  यांची उपस्थिती 
  यावेळी कोटमगावात मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून नवरात्रोउत्सवात बंद ठेवण्याचे निर्देश पत्राद्वारे शहर पोलिसांना देण्याचे आदेश यावेळी नायब तहसीलदारांना दिले. यानंतर शहर पोलीस ठाण्यातही पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या उपस्थितीत ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीतही मंदिर बंद ठेवणे यावरच सहमती सर्वांनी व्यक्त केली. बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब काेटमे, विश्वस्त भाऊसाहेब आदमाने, शरद लहरे, व्यवस्थापक राजेंद्र काेटमे, संतोष परदेशी आदी उपस्थित होते.