lasalgaon onion auction

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 13 दिवसांपासून बंद असलेल्या 15 बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आता आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्येही कांद्याचा लिलाव सुरू झाल्याने शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.

    नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 13 दिवसांपासून बंद असलेल्या 15 बाजार समित्या सुरू झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आता आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती लासलगावमध्येही कांद्याचा लिलाव सुरू झाल्याने शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे.

    लिलावला येताना शेतकऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून येणे तसेच वाहन नोंदणी करणे बंधनकारक केली आहे. त्यानंतर बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालासह प्रवेश दिला जाणार आहे,अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.

    कांद्याला कमाल 1571 रुपये, किमान 700 रुपये तर सर्वसाधारण 1400 रुपये इतका बाजार भाव मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगतिले. सोमवारी कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याअगोदर शेतकऱ्यांची कोरोना तपासणी लासलगाव प्रवेशद्वारावर करण्यात आली. बाजार समिती आवारात आलेले कांदा वाहन तपासणीनंतर सोडण्यात आल्या.