लासलगाव बाजार समितीची कोटींची उलाढाल ठप्प

लासलगाव : केंद्र सरकारच्या आयकर विभागाने लासलगाव बाजार समितीतील १० कांदा निर्यातदार व्यापारी वर्गावर छापे मारले आहेत. यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर सध्या ५ ते ६ हजार क्विंटल आवक होत असून व्यापारी वर्गाने लिलावात सहभागी होण्यास असमर्थता दर्शविल्याने बाजार समितीतील १ ते दिड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली आहे.

कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय कांदयाचे भाव वाढत असल्याने सरकारने काही आठवड्यांपूर्वी घेतला होता. आता सण आणि उत्सवांचे दिवस सुरू झाल्याने कांद्यांची मागणी वाढत असते. तसेच बिहार मध्ये विधानसभा निवडणूका लक्षात घेता महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. कांद्याची निर्यात थांबली तर भाव कमी होतील असे सरकारला वाटत होते. मात्र तरी देखील भाव कमी झाले नाही. लासलगाव ही कांद्यांची आशियातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लासलगावमधूनच देशासह देशाबाहेर कांदा निर्यात केला जातो. वाढत्या भावाचा फटका बसू नये म्हणून व्यापारी वर्गावर प्राप्तीकर विभागाच्या धाडी टाकून भाव पाडण्याचे विचार सरकार करत आहे, असे शेतकरी प्रतिनिधी बोलत आहे.

या सर्वांचा फटका मात्र देशाला कांदा पुरवणाऱ्या लासलगाव बाजार समितिच्या उलाढालवर बसत आहे. सध्या उन्हाळ कांद्याची जरी कमी आवक येत असली मात्र भाव चांगले असल्याने दररोज लासलगाव मुख्य बाजार समितीच्या कोटींची रुपयांची उलाढाल ठप्प होत आहे. कांदा लिलाव सुरू होणे संदर्भात शनिवार व्यापारी वर्गाची बैठक होणार असून लिलाव सुरू करणेबाबत होणाऱ्या निर्णयाकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.