मनपाच्या बससेवेचा शुभारंभ; आधुनिक बसेसमुळे प्रदूषण कमी हाेईल : फडणवीस

  नाशिक : महापािलकेच्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी मोबाईलवर एका क्लिकवर तिकीट बुक करता येणार आहे. बसमध्ये कॅमेरे आहेत. अत्याधुनिक सेवा, इंटिग्रेटेड तिकीट प्रणाली वापरली गेली तर सार्वजनिक वाहतक व्यवस्थेला अधिक प्रतिसाद मिळेल. या बससेवेमुळे प्रदूषणमुक्त नाशिक होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कािलदास कलामंदिरात महापािलकेच्या बससेवेच्या शुभारंभप्रसंगी ते बाेलत हाेते.

  विधानसभेच्या अधिवेशनात ओबीसी आरक्षणावरून एकमेकांसमाेर उभे ठाकलेले पालकमंत्री भुजबळ आणि विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नाशिक येथे बससेवेच्या शुभारंभप्रसंगी एकाच व्यासपीठावर आले हाेेते. गेल्या काही दिवसांपासून या बससेवेची नाशिककरांना प्रतिक्षा होती. यावेळी ५० बसेसचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळयासाठी गिरीश महाजन, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागूल, आयुक्त कैलास जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  ते पुढे म्हणाले की, सामान्यांना चांगली सेवा दिली तरच ते या बससेवेकडे वळणार आहेत. याचा महापालिकेने चांगला अभ्यास केलेला आहे. अॅपमुळे नागरिक माेठा लाभ हाेईल. सर्वच सुिवधा नागरिकांना या अॅपमुळे मिळणार असल्याने नागरिक याचा निश्चितच लाभ घेतील. हळूहळू २५० बसेसपर्यंत महापािलका पाेहाेचणार आहे. केंद्र सरकारकडे पाठवलेल्या ५० इलेिक्ट्रकचा प्रस्ताव लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

  माझा विराेध नव्हता : पालकमंत्री
  पालकमंत्री झाल्यानंतर बससेवेचा विषय माझ्याकडे आला. काेणतेही सार्वजनिक वाहतूक ही फायद्याची नसते. मला त्यावेळी ३५ काेटी रुपयांचा ताेटा हाेईल, असे सांगण्यात आले. हा ताेटा महापािलकेला साेसता अाला पािहजे. जर महापािलकेची ताेटा सहन करण्याची तयारी असेल तरच बससेवा सुरू करावी, असे माझे मत हाेते. त्यामुळे बससेवेला विराेध हाेता, असे नाही तर त्याचा सांगाेपांग विचार व्हावा, असे मी सूचविले हाेते. बससेवेमुळे मनपाला हाेणारा ताेटा हा सर्वसामान्यांच्यावर डाेक्यावर कररूपी अाेझं व्हायला नकाे, याचाही विचार करायला मी सांगितले हाेते. त्यामुळे बससेवेला माझा विराेध हाेेता, असे म्हणणे चुकीचे आहे.

  सध्या डिझेल फारच स्वस्त आहे
  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात इंधन दरवाढ तसेच केंद्राकडून मदत मिळण्याच्या विषयावरून चिमटे काढले. ते म्हणाले की, देशात सध्या डिझेलचे दर फारच कमी आहेत. त्यामुळे महापालिकेने डिझेलवर चालणाऱ्या बसेस खरेदी करून चांगला निर्णय घेतला. आता ही बससेवा ताेट्यात जाणार नाही. तसेच राज्यात विकासाच्या कामात आमचे काही अडले तर मदत करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले आहे. त्यामुळे आता राज्याचा सुसाट विकास हाेईल. तुमच्या नागपूरला आधुनिक मेट्राे आली, वेगवेगळे प्रकल्प आले. पण त्या मेट्राेने प्रवास केला तेव्हा फक्त मी आणि काही पत्रकारच मेट्राेत हाेताे. त्यामुळे आम्ही नाशिकच्या मेट्राेबाबत फारसा विचार केला नव्हता. आमच्या नाशिकच्या विकासाचा वेग नागपूरइतका नसला तरी आम्ही हळूहळू का असेना पण आमच्याकडे चांगले काम हाेते आहे, हे नक्की.

  …म्हणून प्रभू रामचंद्र नाशिकला आले
  नाशिकचे हवामान इतके चांगले आहे. येथे प्रदूषण अत्यंत कमी प्रमाणात हाेते. त्यामुळेच प्रभू रामचंद्रसुद्धा नाशिकला येऊन राहिले. कुसुमाग्रज, कानेटकर असे दिग्गज लेखकही नाशिकनेच दिले आहे. माझा जन्मही नाशिकचाच आहे; आता मी पालकमंत्री आहे. त्यामुळे माझे नाशिकशी एक जिव्हाळ्याचे नेते आहेत. चांगले काम काेणत्याही पक्षाने सूचविले तरी आम्ही विराेध करत नाही. विकासकामांमध्ये राजकारण करणाऱ्यांमधला नाही. विराेध हा फक्त निवडणुकांपुरताच असावा, असे माझे मत आहे. अत्याधुिनक रुग्णालयेसुध्दा उभारण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. त्यामुळे नाशिकचा विकास हाेईल, पर्यटन वाढेल आणि आर्थिक व्यवस्थादेखील सुधारेल. गुन्हेगारी कमी करायची असेल तर नागरिक सुशिक्षित करणे गरजेचे आहे, नाशिककरांनी आपली जबाबदारी ओळखावी. शहरवासियांना सेवा देण्यासाठी कुणीही आडवे येणार नाही, याची मला खात्री आहे.