झोपलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला, गावात भीतीचे वातावरण

  • इगतपुरीतील चिंचलखैरे गावात पहाटे ७ च्या सुमारास महिले झोपलेली असताना हल्ला करत ओढून नेले. यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव भोराबाई महादु आगीवले आहे. बिबट्याने महिलेला १ किलोमीटर पर्यंत ओढत नेले होते.

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे गावात बिबट्याने झोपलेल्या महिलेला ओढून जंगलात नेल्याची घटना घडली आहे. यामुळे गावात भीतीचे वातवरण पसरले आहे. बिबट्याने मानेला चावा घेतल्यामुळे ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. 

इगतपुरीतील चिंचलखैरे गावात पहाटे ७ च्या सुमारास महिले झोपलेली असताना हल्ला करत ओढून नेले. यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव भोराबाई महादु आगीवले आहे. बिबट्याने महिलेला १ किलोमीटर पर्यंत ओढत नेले होते. त्यामुळे महिलेचा मृतदेह घरापासून १ किलोमीटरच्या अंतरावर पोलीसांना सापडला आहे. ही घटना ८ ऑगस्ट २०२० रोजीच्या पहाटेच्या सुमारास घडली आहे. त्यांच्या शेजारी मुलगी जावई आणि मुलं हे देखील झोपले होते. 

हि घटना घरातील मंडळी उठल्यानंतर लक्षात आली

पहाटे बिबट्याने महिलेला ओढून नेले ते कोणाच्याही लक्षात आले नाही. घरातील लोक जेव्हा सकाळी उठली. तेव्हा त्यांना भोराबाई दिसल्या नाहीत. लोकांनी शोध सुरु केला असता त्यांना १ किलोमीटरच्या अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती पोलीसांना कळवाताच तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि वन विभागाने पंचनामा केल्यावर मृतदेह मृतदेश शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. 

झोपेतच बिबट्याने हल्ला केल्यामुळे गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग सापळा रचणार आहे. व कॅमेरे लावणार असल्याचे वन विभाग अधिकारी रमेश डोमसे यांनी सांगितले.