जुने धागूर शिवारातून बिबट्याने चार वर्षीय बालिकेला पळविले

जुने धागूर शिवारात गुजरात राज्यातील सुतारपाडा येथील परप्रांतीय मजूर माळी नामक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांच्या कामाची मजुरीसाठी गेल्या काही कालावधीपासून कुटुंबियासमवेत आलेले आहेत. शेतीची कामे आटाेपून सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करत असताना अचानक व अनपेक्षित बिबट्याचे आगमन झाले व क्षणार्धात डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच बिबट्याने चार वर्षीय बािलकेला उचलून नेले.

  दिंडोरी : तालुक्यातील जुने धागूर शिवारातून गुजरात राज्यातील शेतमजुराच्या रुतिका विठ्ठल वड (४) या अल्पवयीन मुलीला नरभक्षक बिबट्याने कुटुंबियांच्या डोळ्यादेखत उचलून नेल्याने कुटुंबिय सुन्न झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरल्याने शेतमजुरी करणाऱ्या मजुरांची पाचावर धारण बसली आहे.

  क्षणार्धात ओढवले संकट
  याबाबत अधिक माहिती अशी की, जुने धागूर शिवारात गुजरात राज्यातील सुतारपाडा येथील परप्रांतीय मजूर माळी नामक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांच्या कामाची मजुरीसाठी गेल्या काही कालावधीपासून कुटुंबियासमवेत आलेले आहेत. शेतीची कामे आटाेपून सायंकाळच्या सुमारास स्वयंपाक करत असताना अचानक व अनपेक्षित बिबट्याचे आगमन झाले व क्षणार्धात डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच बिबट्याने चार वर्षीय बािलकेला उचलून नेले. बािलकेच्या शोधासाठी कुटुंबिय टाहो फोडत असून, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील परिसरात ठराविक कालावधीनंतर बिबट्याचा वावर सुरु असल्याने शेतकरीवर्ग व
  मजुरांमधे घबराट पसरली आहे.

  काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य
  वनविभागाने या बिबट्याचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे. करंजवण, खेडले, लखमापूर परिसरातही बिबट्याने काही कालावधीपूर्वी दर्शन दिले होते. या बािलकेला बिबट्याने आळंदी धरण परिसरात नेल्याची प्राथमिक मािहती असून, बािलकेवर हल्ला करुन व तिला नेल्याची मािहती पोलीस प्रशासन व वनविभागाला मिळताच शोध मोहीमेला गती देण्यात आली आहे.