सामनगावला बिबट्या जेरबंद : पूर्व भागात बिबट्याची दहशत कायम

गुरुवारी सामनगाव येथे नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने शेतकरी मंदाबाई गणपत जगताप यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे दरम्यान बिबट्या  पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.  अशी महिती राणा जगताप यांनी वनविभागाला दिली.

    नाशिक रोड :  शुक्रवारी पहाटे दरम्यान नाशिक रोड पासून जवळच असलेल्या सामनगाव शिवारातील जगताप मळयात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. याच बिबट्याने अनेक कुत्रे ,जनावरांचा फडशा पडला असावा असे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.

    गुरुवारी सामनगाव येथे नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने शेतकरी मंदाबाई गणपत जगताप यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे दरम्यान बिबट्या  पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.  अशी महिती राणा जगताप यांनी वनविभागाला दिली.महिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी  विवेक भदाणे , वनपरिमंडळ अधिकारी आनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली  वनरक्षक गोविंद पंढरे , वनमजूर निवृत्ती कोरडे, हरी धुळे , वाहनचालक अशोक कानझोडे  यांची टीम सामनगावात दाखल झाली व जेरबंद  बिबट्याला  ताब्यात घेतले .व सुरक्षित रेस्क्यू वाहनाने घेऊन गंगापूर रोपवाटिका येथे ठेवण्यात आले.

    सामनगाव ,चाडेगाव, कोटमगाव, एकलहरे, हिंगणवेढे जाखोरी, चांदगिरी, शिंदे, पळसे या परिसरात बिबट्या चा कायम वावर असतो.तसेच जनावरे हल्ले होत असतात. मागील आठवड्यात चाडेगाव एका शेतकरी ला एकाच वेळी तीन बिबट्या चे दर्शन झाले होते. तर सामनगाव परिसरात परिसरात   शेळीचा फाडसा पाडलेला आहे. तर  परिसरातून अनेकांचे पशुधन व पाळीव कुत्रे ठार केल्याचे घटना घडत आहे. त्यामुळे परिसरात भीती चे  वातावरण निर्माण झाले आहे.