सामनगांव रोड परिसरात बिबट्याचा वावर;  कालपासून दोन वेळा नागरीवस्तीत दिले दर्शन

नाशिकरोडच्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून वनविभागाला बिबट्या जेरबंद करण्यासाठी अपयश येत आहे.

    नाशिक: नाशिक रोडपासून जवळच असलेल्या सामनगांव रोड अश्विनी कॉलनी परिसरात बिबट्याने दर्शन झाले. भरवस्तीत बिबट्याचा वावर (Leopard roaming) दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक गोकुळ अस्वले यांनी बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडीओ काढला आहे. शनिवार आणि आज सकाळीही बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घाबराहट झाली आहे.

    नाशिकरोडच्या पूर्व भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून वनविभागाला ( forest department)बिबट्या जेरबंद करण्यासाठी अपयश येत आहे. सदर बिबट्या माणसाळलेला असल्याचीही चर्चा नागरिकांनामध्ये सुरू आहे. या बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ले करून ठार केल्याच्या घटना घडल्या आहे.

    मात्र शनिवारी सायंकाळी पाच दरम्यान येथील गोकुळ अस्वले कामानिमित्त या ठिकाणी जात असताना अचानक त्यांच्या दुचाकी समोर बिबट्या पळाला मात्र अस्वले यांनी प्रसंगावधान राखत मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. बिबट्याचा परिसरातील ईरीनकडे पलायन केले. ईरीन परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने बिबट्याचे वास्तव या ठिकाणी असल्याचे नागरिकांचे म्हणे आहे. तरी वनविभाग ने याकडे लक्ष केंद्रित करून रेक्सू ऑपरेशन राबविण्याची गरज असण्याची मागणी प्रभागाचे नगरसेवक संतोष साळवे ,नगरसेवक पंडित आवारे सोसायटीचे चेअरमन सूदाम बोराडे, माजी चेअरमन केशव बोराडे, गोकुळ अस्वले,  युवा नेते योगेश भोर, नाना सिरसाट, राहुल घोरपडे, सुनील बोराडे,  अनिल बोराडे, पप्पू गवळी , संजय खाडे, किरण घोडे, शांताराम बोराडे, नाना शिंदे, डॉ भुजबळ, चंद्रभान ताजनपुरे आदी केली आहे.