गांधी नगर एअरफोर्स मध्ये बिबट्या जेरबंद

नाशिक :  गांधी नगर एअरफोर्स स्टेशन उपनगर   परिसरात वनविभाग कडून लावलेल्या पिंजरा गुरुवारी सकाळी दरम्यान बिबट्या जेरबंद झाला आहे.

नाशिक :  गांधी नगर एअरफोर्स स्टेशन उपनगर   परिसरात वनविभाग कडून लावलेल्या पिंजरा गुरुवारी सकाळी दरम्यान बिबट्या जेरबंद झाला आहे.गेल्या चार ते पाच  दिवसांपासून नर बिबट्या  गांधी नगर एअरफोर्स स्टेशन परिसरात आढळला होता. बुधवार दि.१३ वनविभाग ने या ठिकाणी पिंजरा लावला होता.  गुरुवारी दि.१४ रोजी रेक्यू ऑपरेशन  करण्यात आले. साधारण ६  ते७ वर्षाचा  नर बिबट्या   जेरबंद करण्यात आला आहे.  सदर बिबट्या ला  सुरक्षितरित्या गंगापूर रोपवाटिका येथे ठेवण्यात आले आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल आहिरराव,  वनसरंक्षक उत्तर पाटील यांच्या मदत बिबट्या जेरबंद करण्यात आला.