एलआयसीचे कर्मचारी एकदिवसीय संपावर

जितक्या प्रमाणात सरकारी भांडवल विक्री तितक्या प्रमाणात खाजगीकरण होत असल्याने एल आय सी कडून अर्थव्यवस्थेला निधी पुरवठ्यात घट व विमेधारकांच्या बचतीला धोका होईल. भांडवल विक्री करीता एलआयसी कायद्यात बदल करावे लागतील ज्याचे दष्परिणाम काही वर्षांनी जाणवतील.

    नाशिक : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी)चे सर्व कर्मचारी व अधिकारी आज (दि. १८) एकदिवसीय संपावर जाणार आहेत. तशी माहिती विमा कर्मचारी संघटनेने दिली आहे.

    या आहेत मागण्या
    विमा कर्मचारी संघटनेचे मोहन देशपांडे यांनी सांगितले की, आयपीओद्वारे एलआयसीचे सरकारी भांडवल विक्री करणे, भारतीय विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ७४ % पर्यंत वाढवणे, एल आय सी कायद्यातील दुरूस्ती, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण व कर्मचारी विरोधी कायदे ह्या केंद्रीय प्रस्तावांना विरोध म्हणून व ईतर मागण्यांसाठी विमा कर्मचारी-अधिकारयांनी १८ मार्च रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला असल्याचे देशपांडे म्हणाले.

    संघटनेने म्हटले आहे की, जितक्या प्रमाणात सरकारी भांडवल विक्री तितक्या प्रमाणात खाजगीकरण होत असल्याने एल आय सी कडून अर्थव्यवस्थेला निधी पुरवठ्यात घट व विमेधारकांच्या बचतीला धोका होईल. भांडवल विक्री करीता एलआयसी कायद्यात बदल करावे लागतील ज्याचे दष्परिणाम काही वर्षांनी जाणवतील. एलआयसीच्या नफ्यात व संपत्तीमध्ये खाजगी वाटेकरी वाटण्याने लोकांचा पैसा लोकांच्या कल्याणासाठी या सुत्राची अंमलबजावणी भविष्यात अवघड होणार आहे. शिवाय विमेधारकांच्या बोनस मध्ये घट होईल, असे संघटनेने सांगितले आहे.