नाशिकमध्ये लॉकडाऊन वाढणार? नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ

नाशिक - नाशिकमध्ये कोरोना फोफावला आहे. गेल्या ९ दिवसांत नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे. नाशकात ४ दिवसांत २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो कोरोनाबाधित सापडले आहेत.

 नाशिक – नाशिकमध्ये कोरोना फोफावला आहे. गेल्या ९ दिवसांत नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे. नाशकात ४ दिवसांत २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो कोरोनाबाधित सापडले आहेत. नाशिकात कोरोनाची झपाट्याने लागण होत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांत नाशिकमध्ये कोरोना झपाट्याने पसरला आहे. प्रथम नाशिकमधील मालेगावाची कोरोनाग्रस्तांचा आकडा असल्याने चर्चेत होते, मालेगावात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. तर आता मालेगावला पिछाडीवर टाकत नाशिक आघाडीवर आले आहेत. 

नाशिकमध्ये मागील ६९ दिवसात कोरोनाचा आकडा ५०० कोरोनाबाधित रुग्णांवर होता. तोच आता मागील १० दिवसात ५०० रुग्ण सापडले आहेत. तसेच मृत्यूंचा आकडा वाढत आहे. असेच चित्र राहिल्यास नाशिक पुन्हा लॉकडाऊन होण्याचे संकेत नाशिक महापौरांनी दिला आहे. महापौर म्हणाले आहेत की असेच रुग्णांचा आकडा वाढता राहिला तर सरकारसोबत विचार विनिमय करुन पुढील निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापौरांनी जणतेला नियम पाळण्याचे तसेच घरी राहण्याचे आवाहन केले आहे.