महावितरणचा भीमपराक्रम! दिव्यांगांच्या घरातील वीजपुरवठा केला खंडित

लॉकडाऊन काळात सर्व कामधंदे बंद झाल्याने आर्थिक संकटात हे कुटुंब सापडले असून, या कुटुंबाकडे सद्यस्थितही दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती. अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने वीज मीटर काढून नेले. अशावेळी या कुटुंबीयांनी उसनवारी करून वीज वितरण कंपनीला एक हजार रुपये भरणा जमा केला. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते वैभव देवरे यांना समजल्यानंतर त्यांनी नकली यांच्या घरी जाऊन विचारपूस केली व उरलेले वीज देयक भागविले आणि तीन महिने पुरेल अशा स्वरूपाचे किराण देऊन दिला. यावेळी वैभव देवरे, निखिल पवार, नवीन सोनवणे, उत्तम काळे, रोहित गोसावी, वैभव बोधवडे, केदार गोसावी आदी उपस्थित होते.

    सिडको : शहरात लाखाे रुपयांची वीज देयके थकीत ठेवणाऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत असताना महावितरणने मात्र सिडकाेतील केवळ तीन हजार रुपये वीज देयक थकीत असलेल्या िदव्यांग दाम्पत्याच्या घरचा वीजपुरवठा खंडित केल्याने संताप व्यक्त हाेत अाहे. येथील सामािजक कार्यकर्ते वैभव देवरे यांनी मात्र अापली सामािजक बांधिलकी जपत या दाम्पत्याचे वीज देयक अदा करून पुन्हा वीजपुरवठा सुरळीत करून घेतला.

    सामािजक बांधिलकी जपली
    अंध व अपंग दांपत्याच्या घराचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती समजतात सिडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते वैभव देवरे यांनी समजली असता त्यांनी कुटुंबियांसाठी मदतीचा हात दिला व या दाम्पत्याला स्वखर्चाने तीन महिन्याचा किराणा देऊन सामाजिक बांधिलकी जपली याशिवाय महावितरणने ही त्यांच्या घराचा खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत केला.

    उदरनिर्वाहासाठी घरकाम
    चेतना नगर परिसरातील सदिच्छा नगर येथे छाया भास्कर नकली व भास्कर रामचंद्र नकली हे दांपत्य एका समाजसेवी संस्थेने दिलेल्या घरात राहतात. या दाम्पत्याकडे अवघे तीन हजार रुपयाची वीजबिल थकल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घरचा वीजपुरवठा खंडीत केला होता. भास्कर नकली पूर्णतः अंध व कर्णबधिर आहेत तर त्यांच्या पत्नी छाया नकली या अपंग आहेत. आपल्या उदरनिर्वाहासाठी हे दांपत्य रस्त्यावर खूर्ची, बाज विणणे, दुरुस्ती करणे तसेच छाया नकली या इतरांच्या घरची घर कामे करून उदरनिर्वाह भागवतात.

    उसनवारी करून भरले हजार रुपये