मनमाडला रेल्वे एम्प्लाॅईज असोसिएशनतर्फे आंदोलन

खासगीकरण केल्यास चक्का जाम आंदोलनाचा इशारा

मनमाड : केंद्र सरकारतर्फे रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनतर्फे गुरुवारी मनमाड शहरात रेल्वे वर्क शॉप आणि इंजीनीयर कार्यालय या दोन ठिकाणी मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी संतप्त कामगारांनी तीव्र निदर्शने करत केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र यावेळी कारखाना प्रबंधक मोहम्मद फैज यांना निवेदन देण्यात आले. त्यात शासनाने रेल्वेचे खाजगीकरण करू नये, अन्यथा सर्वच रेल कामगार संघटना चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

केंद्र शासनाने अनेक रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन, कारखाने खासगी उद्योगाला देण्याचा धडाका लावला असून, आगामी काळात संपूर्ण रेल्वे विभागाचे खाजगीकरण केले जाईल, अशी भीती रेल्वे कामगारांना वाटत असून, या खाजगीकरणाच्या विरोधात रेल्वे कामगार संघटना रस्त्यावर उतरल्या आहे. आज ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे रेल्वे वर्क शॉप आणि इंजिनियर कार्यालय या दोन ठिकाणी मोर्चा काढून धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त कामगारांनी केंद्र सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार हाय, हाय, मोदी सरकर होश मे आओ, होश मे आकर बात करो, यासह इतर घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडले होते. जेव्हापासून मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून त्यांनी अनेक कंपन्यांचे खाजगीकरण केले आहे. आता केंद्र सरकार रेल्वेचे ही खाजगीकरण करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केला. केंद्र शासनाचा हा डाव सहन केला जाणार नाही. जर रेल्वेचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला तर रेल्वे कामगार संघटना त्याला तीव्र विरोध करून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रत्नदीप पगारे, शरद झोबाड, प्रदीप गायकवाड, सम्राट गरुड, अजित जगताप, रोहन उबाळे, आनंद संसारे, वसंत सोनवणे, भगवान केदारे, राहुल केदारे, पंकज कदम, प्रतिभा पगारे, सुषमा सोनवणे प्रवीण अहिरे,सचिन इंगळे, शरद झोबाड, प्रविण बागूल, प्रकाश बोडके, संजय दीक्षित, कल्याण धिवर, विजय गेडाम, रमेश पगारे, संदीप पगारे, सागर गरुड सुभाष जगताप, सुनील सोनवणे, रत्नदिप पगारे, सचिन इंगळे, हर्षल सूर्यवंशी, प्रेमदीप खडताळे, राकेश ताठे, किरण आहिरे, विशाल त्रिभुवन, संदीप अर्जुन पगारे, गुलाब वैरागर, अल्ताफ खान, किशोर खंडागळे, किरण अहिरे, संदीप धिवर, अर्जुन बागूल, सागर साळवे, मनोज गावंडे, फकीरा सोनवणे, प्रभाकर निकम, रवींद्र पगारे, रोहित भोसले, सिध्दार्थ जोगदंड उपसि्थत हाेते.