chhagan bhujbal

पोलिसांचा मोठा बंदोबस्त फार्म भोवती करण्यात आला होता. परंतु आक्रमक आंदोलकांनी सर्व लोखंडी बॅरिकेट्स पार करुन घोषणाबाजी करत फार्मकडे वाटचाल केली आहे. आंदोलकांना फार्मच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी रोखले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी भुजबळ बाहेर गेले असल्याने कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.

नाशिक : मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणी मराठा समाज (Maratha community) आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मराठा आक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी (Maratha protesters) नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या फार्मला (residence) घेराव घातला आहे. हे भुजबळ यांचे निवासस्थान आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त फार्म भोवती करण्यात आला होता. परंतु आक्रमक आंदोलकांनी सर्व लोखंडी बॅरिकेट्स पार करुन घोषणाबाजी करत फार्मकडे वाटचाल केली आहे. आंदोलकांना फार्मच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी रोखले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी भुजबळ बाहेर गेले असल्याने कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, जो पर्यंत पालकमंत्री छगन भुजबळ येत नाहीत तोपर्यंत हलणार नाही. अशी आक्रमक भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे.