Punishment to the student for not completing homework ... Boiling oil clicks on the hands

इगतपुरीत एका बापाने आपल्या पोटच्या मुलांचा प्रचंड छळ केल्याची घटना घडली आहे. या बापाने मुलीला चटके दिले आहेत. तर, मुलाला लाकडाने बेदम मारहाण केली आहे. हा बाप आहे की हैवान असा प्रश्न या प्रकारानंतर उपस्थित केला जात आहे.

  • Massive abuse two children father Nashik नाशिक छळ मारहाण चटके

नाशिक : इगतपुरीत एका बापाने आपल्या पोटच्या मुलांचा प्रचंड छळ केल्याची घटना घडली आहे. या बापाने मुलीला चटके दिले आहेत. तर, मुलाला लाकडाने बेदम मारहाण केली आहे. हा बाप आहे की हैवान असा प्रश्न या प्रकारानंतर उपस्थित केला जात आहे.

राहुल विजय मोरे असे या निष्ठूर बापाचे नाव असून तो रेल्वे पोलिसात नोकरीला आहे. तो या मुलांचा सावत्र पिता आहे. पहिल्या पत्नीपासून त्याला ही दोन मुल झाली होती.

या निष्ठूर बापाने आपल्या पाच आणि आठ वर्षांच्या मुलांना प्रचंड मारहाण केली आहे. पाच वर्षांच्या प्रियांशू या मुलीच्या हाताला चटके दिले तर आठ वर्षांच्या हिमांशू या मुलाला लाकडाने मारहाण केली आहे.

या मुलांची आई हयात नाही. आई गेल्यावर ही मुलं त्यांच्या आजीकडे राहायला गेली. पण, गेल्या दोन महिन्यांपासून ही मुलं बापाकडे राहायला गेल्यावर या मुलांचे बाप आणि सावत्र आईने प्रचंड हाल सुरू केले. या दोन मुलांचा होणारा शारीरिक छळ शेजारच्यांच्या लक्षात आल्याने चिडलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली.

इगतपुरी पोलिसांनी या दोन्ही मुलांची सुटका केली आहे. या दोघांना आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची मावशी आणि मावस आजी या दोन्ही मुलांची काळजी घेत आहे.