
नुकसान झालेल्या निधीची जबाबदारी ११ संचालकांसह सचिवावर निशि्चत करण्यात आली असून, त्यांच्याकडून कलम ५७ (२) नुसार वसुलीचे आदेश दिले आहे. नाशिक बाजार समिती जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणारी समिती म्हणून ओळखली जाते.
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या निधीचे झालेल्या नुकसानीचा अहवाल सुरगाणा येथील चौकशी अधिकारी सहाय्यक निबंधक माधव शिंदे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना सादर केला होता. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी सोमवारी (ता.५) बाजार समितीचा सुमारे १ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचा निधीचे नुकसान झाले आहे.
या नुकसान झालेल्या निधीची जबाबदारी ११ संचालकांसह सचिवावर निशि्चत करण्यात आली असून, त्यांच्याकडून कलम ५७ (२) नुसार वसुलीचे आदेश दिले आहे. नाशिक बाजार समिती जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणारी समिती म्हणून ओळखली जाते. संचालक मंडळाने कोरोना काळात अन्नधान्याचे केलेले वाटप आणि टोमँटो मार्केटमधील भाडे वसुलीमध्ये झालेले बाजारसमितीचे नुकसान हे लक्षात घेवुन चौकशी अधिकारी माधव शिंदे यांनी आपल्या अहवालामध्ये १ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, त्याला संचालक मंडळाला जबाबदार पकडण्यात आले आहे. हा निधी वसूल करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीष खरे यांनी संचालकांकडून वसुलीसाठी उपनिबंधक फयाज मुलानी यांची नेमणूक केली आहे.
अशी हाेेणार वसुली
देवीदास िपंगळे : ९ लाख ८७ हजार ४२८ रुपये
संपत सकाळे : १० लाख १ हजार ६६६ रुपये
युवराज काेठुळे : ९ लाख ८७ हजार ४२८ रुपये
दिलीपराव थेटे : ९ लाख ८७ हजार ४२८ रुपये
विश्वास नागरे : ९ लाख ८७ हजार ४२८ रुपये
तुकाराम पेखळे : १५ लाख ६७ हजार ४२८ रुपये
ताराबाई माळेकर : ९ लाख ८७ हजार ४२८ रुपये
विमलबाई जुंद्रे : ५ लाख ८० हजार रुपये
शंकरराव धनवटे : ५ लाख ८० हजार रुपये
संदीप पाटील : ५ लाख ८० हजार रुपये
रवींद्र भाेेये : ४ लाख २१ हजार ६६६ रुपये
अरुण काळे (सचिव) : १९ लाख ८९ हजार ९५ रुपये
सहाय्यक निंबधक माधव शिंदे यांनी चुकीचा अहवाल सादर केला आहे. याबाबत आम्ही पूर्वीच पणन संचालक यांच्याकडे अपील दाखल केले आहे. यावर ७ एप्रिल रोजी सुनावणी आहे. त्यामुळे या चौकशीवरच आमचा संशय आहे.
- देविदास पिंगळे, सभापती