आमदाराचा नाशिकमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर मुंबईत आला निगेटिव्ह, जाणून घ्या

  • नाशिकमधील विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा कोरोना अहवाल नाशिकमधील लॅबमध्ये पॉझिटिव्ह आला तर दुसऱ्या दिवशी मुंबईत तपासणी करता कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांच्याबरोरबच कुटुंबातील ९ सदस्यांचा कोरोना अहवाल नाशिकमध्ये पॉझिटिव्ह आला तर मुंबईतील तपासणीत निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आमदारांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. मुंबईतील खासगी लॅबमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

नाशिक – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. यातच कोरोना रुग्णांच्या आणि संशयितांचे अहवालांबाबत संभ्रम असताना नाशिकमधील आमदाराचाचं कोरोना अहवाल नाशिकमध्ये पॉझिटिव्ह आणि मुंबईमध्ये निगेटिव्ह आला आहे. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 

काय आहे प्रकरण 

नाशिकमधील विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा कोरोना अहवाल नाशिकमधील लॅबमध्ये पॉझिटिव्ह आला तर दुसऱ्या दिवशी मुंबईत तपासणी करता कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांच्याबरोरबच कुटुंबातील ९ सदस्यांचा कोरोना अहवाल नाशिकमध्ये पॉझिटिव्ह आला तर मुंबईतील तपासणीत निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आमदारांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. मुंबईतील खासगी लॅबमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

आमदार नरेंद्र दराडे हे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या तसेच व्यक्तींच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे कोणतीही लक्षणे नसताना त्यांनी नाशिकमधील खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याचा कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. आमदार नरेंद्र दराडे लगेच मुंबईला रवाना होऊन फोर्टीस रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांच्यावर उपचारादरम्यान पुन्हा कोरोनाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. 

आमदार यांच्यानंतर कुटुंबासह २२ सदस्यांची कोरोना चाचणी केली असता ९ सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यांची पुन्हा चाचणी केल्यास कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे कुटुंबासह समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

या प्रकरणातबाबत आमदार नरेंद्र दराडे यांनी म्हटले आहे की ते या घटनेबाबत मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिणार आहेत. त्यांना लेखी तक्रार करणार असल्याचे म्हणाले आहेत.