नाशिक महापालिकेतील स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेची उडी; महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार

तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे ८, शिवसेनेचे ५, काँग्रेसचा १, राष्ट्रवादीचा १, तर मनसेचा १सदस्य असेल. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    नाशिक : नाशिक महापालिकेतील स्थायी समितीच्या निवडणुकीची उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, भाजपासह मनसेने सुद्दा निवडणुकीत उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे. स्थायी समितीच्या सर्वच १६ सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे.

    तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भाजपचे ८, शिवसेनेचे ५, काँग्रेसचा १, राष्ट्रवादीचा १, तर मनसेचा १सदस्य असेल. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    तौलनिक संख्याबळाचं काय आहे प्रकरण?

    तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात तक्रार केली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली. यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या एकाने वाढली आहे. सत्ताधारी भाजपला हायकोर्टाच्या निर्णयाचा मोठा धक्का बसला, तर शिवसेनेला एका जागेची लॉटरी लागली आहे.