नाशिकमधील प्रतिबंधित क्षेत्रांत मोबाईल दवाखान्याद्वारे करणार तपासणी

  • महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबूकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या उपाय योजना केल्या आहे. शहरातील सुविधांविषयी भाष्य केले तर शहरातील कोरोना रुग्नांची संख्या, आयुक्तांनी काळजी घेण्यास देखील सांगितले आहे. नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात ४०० पथकांद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे.

 नाशिक – नाशिकमध्ये मंगळवारपासून कंन्टेनमेंट झोनमध्ये २० मोबाईल दवाखाने पोहोचणार आहेत. या मोबाईल दवाखान्याच्या माध्यमातून तपासणी होणार आहे. यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील इतर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांना उपयुक्त ठरणार आहे. या मोबाईल व्हॅन मध्ये अँटीजन टेस्ट किट असतील. अँटिजन टेस्ट किटने चाचणी केल्यास त्याचा अहवाल लवकर कळण्यास मदत होईल. अर्ध्या तासात कोरोना रुग्णाचा अहवाल मिळेल. असे महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबूकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या उपाय योजना केल्या आहे. शहरातील सुविधांविषयी भाष्य केले तर शहरातील कोरोना रुग्नांची संख्या, आयुक्तांनी काळजी घेण्यास देखील सांगितले आहे. नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात ४०० पथकांद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे. 

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची चाचणी होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. घाबरण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले. कोरोना रुग्णांच्या बेड विषयी आयुक्तांनी सांगितले की,बिटको रुग्णलयात ३०० बेड, वसतिगृहात ५०० बेड, मेरी येथे २०० बेड तर ठक्कर डोम येथे ३५० बेडची तयारी करण्यात आली आहे. तसेच खसगी रुग्णालयातही बेड आरक्षित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या वेबबेस पोर्टलद्वारे बेडची माहिती दिली जाणार असल्याचे देखील म्हटले आहे.