कोविड हॉस्पीटलमध्ये घुसून महिला डॉक्टरचा विनयभंग; नाशिकमध्ये खळबळ

कोरोना काळात जीवावर उदार होवून रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा खळबळजनक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. कोविड हॉस्पीटलमध्ये घुसून महिला डॉक्टरचा विनयभंग करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.

    सिडको : कोरोना काळात जीवावर उदार होवून रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा खळबळजनक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. कोविड हॉस्पीटलमध्ये घुसून महिला डॉक्टरचा विनयभंग करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे.

    छावा संघटनेचा पदाधिकारी असल्याचा बनाव करीत आरोपींनी हे कृत्य केले आहे. सिडकोतील एका रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. अंबड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

    आरोपींपैकी एकाने मी छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष असल्याचे इतर जण पदाधिकारी असल्याचे सांगत व तुमच्या येथे बाल कामगार काम करतात, अशी कुरापत काढत कोविड रुग्णालयांमधील महिला डॉक्टरचा विनयभंग केला. तसेच विनामास्क शिवीगाळ करून गैरवर्तन केले.

    या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, चारही संशयितांवर विनयभंगाचा व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.