अखेर आईची अंतिम ईच्छा पूर्ण…  मूळगावी दफन विधीसाठी मुलाने ३ महिने झिजवले शासकीय यंत्रणांचे उंबरे

एका मुलाने तब्बल ३ महिने शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजवून आईच्या अंतिम इच्छेनुसार तिचा दफनविधी मूळगावी मनमाडला केला.

मनमाड: जन्मदात्याचा अनादर करणाऱ्याना चपराक देणारी एक घटना मनमाड शहरात समोर आली.एका मुलाने तब्बल ३ महिने शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजवून आईच्या अंतिम इच्छेनुसार तिचा दफनविधी मूळगावी मनमाडला केला. म्हणता ना ‘ स्वामी तिन्ही जगाचा असला तरी आई विना तो भिकारी असतो’ आजच्या युगात असे ही आहेत की ते जन्म देणाऱ्या आईसाठी काहीही करायला तयार असतात

आईचे महत्व पटवून देणारी ही घटना घडली २२ सप्टेंबर रोजी.मनमाड च्या कॅम्प भागात राहणारे सुहास श्रीरसागर यांच्या आई मनजुळता यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना मालेगाव येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेडॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना निमोनियाचा त्रास असल्याचे समोर आल्यावर त्यांना कोविड सेंटर मध्ये दाखल करून त्यांचा स्वब घेण्यात आला स्वब च्या रिपोर्ट येण्याअगोदर त्यांचे निधन झाले.
आपण वाचणार नाही याची चाहूल लागल्यानंतर त्यांनी मुलगा सुहासला सांगितले की त्यांची अंतिम इच्छा आहे की त्यांचा दफनविधी हा मनमाडला व्हावा. मात्र त्यांचा कोरोना रिपोर्ट न आल्याने त्यांना कोरोना संशयित मानून त्यांचा दफनविधी मालेगाव येथील ख्रिश्चन कब्रस्तान मध्ये करण्यात आला  आपल्या परिवारातील सर्व लोकांचा दफन विधी हा राहत असलेल्या मनमाड मध्ये झाला आहे आणि आईची अंतिम इच्छा ही होती की त्याचा दफन विधी ही मनमाड ला करावा.  पण ते न झाल्याने सुहास अस्वस्थ झाला आणि काहीही करून आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा त्याने चंग बांधला मात्र त्याचा समोर सर्वात मोठी अडचण होती की मालेगाव येथे दफन झालेला मृतदेह कसं कबरीतून काढून तो मनमाडला आणायचा त्याने त्याची ही समस्या आणि आईची अंतिम इच्छा फुले शाहू आंबडेकर मुस्लिम विचार मंचचे कार्यकर्ते फिरोज यांना सांगितले ते त्याला घेऊन सामाजिक कार्यकर्ते ऍड जावेद शेख यांच्याकडे घेऊन गेले.

त्यांनी ऍड फरीदा मिठाईवाले यांनी सुहासला कायदेशीर मार्ग दाखविला त्याचा अवलंब करत सुहास आणि फिरोज शेख यांनी महापालिका, प्रांत कार्यलय,तहसीलदार, आरोग्य विभागाकडे अर्ज केले या कामी त्यांना माजी आमदार असिफ शेख सह मालेगावचे काही नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. शिवाय पूर्ण खबरदारी व प्रतिबंधक उपाय योजना करण्याची हमी नातेवाईकांनी शासनाला दिली. मालेगाव मनपा चे मृतदेह स्थलांतर करणे बाबतचे नाहरकत प्रमाणपत्र, संत पॉल चर्च मालेगाव यांचे मृतदेह नेण्यासाठी चे नाहरकत प्रमाणपत्र, मनमाड ख्रिश्चन मिशनरी चे मृतदेह दफन करून घेणे बाबदचे नाहरकत प्रमाणपत्र यासह अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

अखेर सुहास ने केलेल्या अथक प्रयत्नला तब्बल ३ महिन्या नंतर यश मिळाले कार्यकारी दंडाधिकारी,प्रभाग अधिकारी,स्वच्छता निरीक्षक, चर्च व्यवस्थापक,पोलीस व मयताचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत मनजुळता यांचा मृतदेह मालेगावच्या दफनभूमीतुन काढल्यानंतर तो मनमाडला आणण्यात आला येथे ख्रिश्चन धर्माच्या रितिरिवाजा प्रमाणे त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी पालक,ख्रिश्चन व मुस्लिम व इतर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या आईला अंतिम विदाई देतांना सुहासला अश्रू अनावर झाले आज माझ्या आईची अंतिम इच्छा पूर्ण झाली असून तिच्या आत्मेला शांती मिळाली आहे. असे भावनिक उदगार त्याने काढून त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे त्याने आभारही मानले. या घटनेतून आई बद्दल मुलाचे असलेले प्रेम तर दिसून आलेच शिवाय जाती जातीत फूट पडणाऱ्याना देखील चपराक बसली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही