इगतपुरीजवळ अपघातात मुंब्राचे पोलीस निरीक्षक ठार

आपल्या कारने कुटुंबियांसह मुंबईकडे परतत असताना सायंकाळी ६.३० ते ८ वाजेच्या सुमारास खांडवी यांच्या कारची रायगडनगरजवळ एका मालवाहू ट्रकशी धडक झाली. या धडकेत पोलीस निरीक्षक खांडवी जागीच ठार झाले. अपघाताची माहिती कळताच वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

    नाशिक : इगतपुरी तालुक्यातील रायगडनगर जवळ कार व मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग खांडवी (४५) हे जागीच ठार झाले.
    मुंब्रा येथील पोलीस निरीक्षक पांडूरंग खांडगी हे काल एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी नाशिक येथे आले होते. हा कार्यक्रम आटाेपून रात्री आपल्या कारने कुटुंबियांसह मुंबईकडे परतत असताना सायंकाळी ६.३० ते ८ वाजेच्या सुमारास खांडवी यांच्या कारची रायगडनगरजवळ एका मालवाहू ट्रकशी धडक झाली. या धडकेत पोलीस निरीक्षक खांडवी जागीच ठार झाले. अपघाताची माहिती कळताच वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकांविरुद्ध वाडीव-हे पोलीस ठाण्यात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नितीन शिंदे करीत आहे.