Murder-Photo

मालेगाव : येथील मनमाड चौफुली जवळील न्यू राजस्थान हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाचा काल रविवार दि.६ डिसेंबर रोजी मध्यरात्री खून झाल्याची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. कृष्णा चैत्राम सोनवणे वय ५६ रा. शबरी माता नगर, चंदनपुरी शिवार मालेगाव असे या मृत व्यक्तीचे नाव असून काल मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान त्यांचा खून झाला. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नी राधाबाई कृष्णा सोनवणे यांच्या फिर्यादीवरून किल्ला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत कृष्णा सोनवणे यांची मनमाड रोडवरील न्यू राजस्थान हॉटेल समोर टपरी असून रात्री ते हॉटेलच्या ओट्यावर झोपून हॉटेलची सुरक्षा सांभाळात होते. सोमवारी सकाळी त्यांच्या पत्नी राधाबाई ह्या त्यांना उठविण्यासाठी गेल्या असता त्यांना कृष्णा सोनवणे राक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मयत कृष्णा यांच्या छातीवर व पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान श्वान पथक व फॉरेन्सिक विभागाचे पथक घटना स्थळी दाखल झाले होते. पूढील तपास किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.एच.भदाणे करीत आहे.