नांदूरटेकला सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

चांदवड : नांदूरटेक (ता.चांदवड) येथील विवाहितेने पती, सासरे, सासू यांच्या त्रासाला कंटाळून पळसखोडी नाला बल्डिंग बंधाऱ्यातील पाण्यात आत्महत्या केली. या घटनेबाबत मयत विवाहितेचे वडील दामू शंकर कडाळे यांनी सासरच्या मंडळी विरोधात फिर्याद दिल्याने पती, सासू, सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

चांदवड पोलिसात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

चांदवड : नांदूरटेक (ता.चांदवड) येथील विवाहितेने पती, सासरे, सासू यांच्या त्रासाला कंटाळून पळसखोडी नाला बल्डिंग बंधाऱ्यातील पाण्यात आत्महत्या केली. या घटनेबाबत मयत विवाहितेचे वडील दामू शंकर कडाळे यांनी सासरच्या मंडळी विरोधात फिर्याद दिल्याने पती, सासू, सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

चांदवड तालुक्यातील खडकओझर येथील केद्राई माता देवस्थान जवळ राहत असलेले दामू शंकर कडाळे (६०) यांची मुलगी रुपाली (२६) हिंचा १२ वर्षापूर्वी तालुक्यातील नांदूरटेक येथील समाधान नामदेव गोधडे यांच्यासोबत विवाह झाला होता. मागील एक दीड वर्षापासून पती समाधान, सासरे नामदेव व सासू हिराबाई हे जमीन लेव्हल करण्यासाठी व घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरून २० हजार रुपये आणावेत यासाठी मुलगी रुपाली हिचा शारीरिक, मानसिक, छळ करीत होते. सासरच्या या सततच्या त्रासाला कंटाळून रुपालीने मंगळवार (१३) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नांदूरटेक शिवारातील पळसखोडी नाला बल्डिंग बंधाऱ्यातील पाण्यात उडी मारीत आत्महत्या केली. या घटनेबाबत वडील दामू कडाळे यांनी मयत रुपालीचे पती समाधान गोधडे, सासरे नामदेव गोधडे, सासू हिराबाई गोधडे यांच्याविरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तिघा संशयिताना अटक केली आहे.