Narayan Rane Controversy: नारायण राणेंवर गुन्हे दाखल करणारे नाशिकचे दबंग आयुक्त दिपक पांडेच्या बदलीसाठी दबाव वाढला

शहरातील भुमाफिया विरोधात पांडे यांनी मोक्का अंतर्गत करावाई करून अद्दल घडवली, शहरातील गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देत गुन्हेगार सुधार योजना राबवली तर त्याच वेळी अट्टल गुन्हेगारांना शंभरहून अधिक गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत करावाई केली. मोर्चे आंदोलन करणाऱ्या राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करत कोणाचीही भीडभाड न ठेवता दबंगगिरी सुरूच ठेवली, तोच प्रत्यय नारायण राणे यांच्यांवर गुन्हा दाखल करताना दिसला. राज्यात कुठे नाही पण नाशकात थेट केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला.

  मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर महाड मध्ये केलेल्या  वक्तव्याची नाशिक मध्ये दखल घेत गुन्हा दाखल करून देशभरात चर्चेत आलेल्या नाशिकच्या पोलीस आयुक्त दिपक पांडेची केंद्र सरकारने उचलबांगडी करण्याचे ठरविल्याने बदलीची शक्यता व्यक्त होत आहे. संजय राऊत आणि शिवसेनशी असणाऱ्या जवळीकीमुळेच दीपक पांडेच्या बदलीसाठी दबाव वाढत असल्याचे बोलले जाते.

  नाशिकचे पोलीस आयुक्त देशभर चर्चेत

  नाशिकचे पोलीस आयुक्त हे नाशिककरच नाहीत तर देशभरात चर्चेत आलेत. १९९९ च्या बॅचचे भापोसे अधिकारी असणारे दीपक पांडे यांनी ४ सप्टेंबर २०२० मध्ये नाशिक पोलीस आयुक्तलयाचा कारभार हाती घेतला. तेव्हापासूनच त्यांची कारकीर्द गाजत आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी पोलिसांसाठी कोव्हिड सेंटरची निर्मिती केली. पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय सुदृढ राहतील तरच पोलीस गुन्हेगारीचा बिमोड करू शकतो त्यामुळे गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी पांडे यांनी कोव्हिड सेंटरकडे लक्ष दिले.

  कोरोना काळात ग्रीन ज्यूसचे धडे

  कोरोना काळात ग्रीन ज्यूसचे धडे देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनाही ग्रीन ज्यूस पिण्यास भाग पाडले. जेव्हा त्यांनी कामाला सुरवात केली तेव्हा उघड उघड महसूल विभागाला अंगावर घेत शहरातील जुगार मटका अड्यावर करावाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे पोलिसांची नाही गरज पडली तर आम्ही बंदोबस्त देऊ असा दावा केल्याने वाद निर्माण झाला. विभागीय महसूल आयुक्तांच्या कोर्टात हा वाद सोडविण्यात आला.

  भीडभाड न ठेवता दबंगगिरी सुरूच

  शहरातील भुमाफिया विरोधात पांडे यांनी मोक्का अंतर्गत करावाई करून अद्दल घडवली, शहरातील गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देत गुन्हेगार सुधार योजना राबवली तर त्याच वेळी अट्टल गुन्हेगारांना शंभरहून अधिक गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत करावाई केली. मोर्चे आंदोलन करणाऱ्या राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करत कोणाचीही भीडभाड न ठेवता दबंगगिरी सुरूच ठेवली, तोच प्रत्यय नारायण राणे यांच्यांवर गुन्हा दाखल करताना दिसला. राज्यात कुठे नाही पण नाशकात थेट केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला.

  चढ उताराची संघर्षमय कारकिर्द

  दबंग पोलीस अधिकारी दीपक पांडे यांची १२ वर्षाची सेवा बाकी असून कारकिर्द संघर्षमय आणि अनेक चढ उताराची राहिली आहे. नागपूरमध्ये प्रशिक्षण घेत सेवा सुरू करणारे पांडे यांनी गडचिरोली, रत्नागिरी, अकोला या जिल्ह्यासह राज्य राखीव दलात ही सेवा बजावली. राज्यपालांचे एडीसी म्हणून काम करणारे पांडे यांच्या पत्नी देखील सनदी अधिकारी आहेत त्यांच्यातील कौटुंबिक वादानंतर ४ वर्ष दीपक पांडे निलंबित होते. नाशिकला येण्याआधी कारागृहाचे आयजी ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.

  बदलीसाठी चक्रे फिरल्याची चर्चा

  शिवसेनेशी असणारी सलगी त्यांच्या पुढील कारकिर्दीत अडचण  ठरल्याचे सांगण्यात येत आहे. नारायण राणे यांच्यांवर गुन्हा दाखल करणे, भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसैनिक ५ दिवस फरार असणे, संजय राऊत यांनी दीपक पांडे यांची भेट घेणे, पांडे यांच्या कार्य पद्धतीचे राऊत यांच्यांकडून खुलेआम कौतुक करणे, या सर्व घडामोडी केवळ योगायोग नाहीत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात हिरो झालेले पांडे आता थेट केंद्र सरकारच्या रडारवर आले आहेत त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी चक्रे फिरल्याची चर्चा जोरात आहे.