Live Update | पोलिस नारायण राणे यांना घेऊन महाडच्या दिशेने रवाना | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट1 month ago

पोलिस नारायण राणे यांना घेऊन महाडच्या दिशेने रवाना

ऑटो अपडेट
द्वारा- Navarashtra News Network
द्वारा- Kaustubh Khatu
17:08 PMAug 24, 2021

पोलिस नारायण राणे यांना घेऊन महाडच्या दिशेने रवाना, उद्या महाड न्यायालयात करणार हजर

16:57 PMAug 24, 2021

नारायण राणेंना पोलिसांनी घेतले ताब्यात, आजच्या दिवशीची जन आशीर्वाद यात्रा स्थगित

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जन आशीर्वाद यात्रेसाठी निघालेल्या राणेसाहेबांना ताब्यात घेतल्यामुळे आजच्या दिवशी निवळीपासून पुढे रत्नागिरीमध्ये आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या घटनेने कार्यकर्ते डगमगले नसून अधिक जोमाने कामाला लागणार आहेत. निर्धार पक्का आहे आणि जन आशीर्वाद यात्रा पूर्ण होणार आहे.

16:53 PMAug 24, 2021

16:14 PMAug 24, 2021

राणे आणि पोलीस अजून न्यायालयात पोहचले नाहीत

16:13 PMAug 24, 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे   रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना ताब्यात घेतले त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले.त्यानंतर सध्या संगमेश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे . यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना हटवलं संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे

15:49 PMAug 24, 2021

राणेंना संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नेलं

15:13 PMAug 24, 2021

नारायण राणेंच्या तब्येतीची तपासणी सुरु

15:10 PMAug 24, 2021

नारायण राणेंना पोेलिसांनी घेतलं ताब्यात

15:04 PMAug 24, 2021

12:18 PMAug 24, 2021

राणेंनी वक्तव्य मागे घ्यावं - शंभुराज देसाई

Load More

भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी आता नाशिक पोलिस आयुक्तांनी करवाईचे आदेश दिले आहेत. या संदर्भात नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून राणे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यात्रे दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘कानाखाली वाजवली असती’ अस वक्तव्य राणे यांनी केलं होतं. ते रायगड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

या पत्रकार परिषदेत बंद मंदिरे, उत्सव आणि कोरोनाची तीसरी लाट या मुद्द्यानवर प्रश्न विचारण्यात आले. आणि पत्रकारांच्या याच प्रश्नांना उत्तर देताना मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली.

काय म्हणाले राणे?

या पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की, “आमच्याकडे सल्लागार नाहीत का? कोरोनाची तिसरी लाट कुठून आणि कशी येणार हे याला कुणी सांगितलं? या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होणार आहे म्हणे, त्याला म्हणावं अपशकुनासारखं बोलू नको. स्वातंत्र्यदिनाबद्दल ज्यांना काही माहिती नाही अशा लोकांनी  जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती’ असं नारायण यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे आता आदेशा प्रमाणे नाशिक पोलिस नारायण राणे यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करणार का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२६ रविवार
रविवार, सप्टेंबर २६, २०२१

महाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.