Nashik cat and leopard fight

रात्रभर या विहिरीत बिबट्या आणि मांजराचा मुक्काम राहिला. बिबट्या आणि मांजर दोघेही आमने सामने होते. बिबट्याच्या तावडीत सापडले असताना या मांजरीने जबरदस्त टशन दिली. रात्रभर वाघाच्या डरकाळ्यांनी गावकऱ्यांची झोप उडाली. ग्रामस्थांना विहिरीकडे धाव घेतली असता त्यांना बिबट्या आणि मांजर एकमेकांवर गुरगुरताना दिसले. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    नाशिक : बिबट्या आणि मांजर यांचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. नाशिकच्या सिन्नरमधील हा व्हिडिओ आहे.

    एक बिबट्या मांजरीचा पाठलाग करत होता. यावेळी हे दोघेही एका विहीरीत पडले. रात्रीच्या वेळेस भक्ष्याच्या शोधात मांजराचा पाठलाग करतांना विहिरीचा अंदाज न आल्यामुळे बिबट्या आणि मांजर विहिरीत पडले.

    रात्रभर या विहिरीत बिबट्या आणि मांजराचा मुक्काम राहिला. बिबट्या आणि मांजर दोघेही आमने सामने होते. बिबट्याच्या तावडीत सापडले असताना या मांजरीने जबरदस्त टशन दिली. रात्रभर वाघाच्या डरकाळ्यांनी गावकऱ्यांची झोप उडाली. ग्रामस्थांना विहिरीकडे धाव घेतली असता त्यांना बिबट्या आणि मांजर एकमेकांवर गुरगुरताना दिसले. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    दरम्यान, तब्बल सात तासानंतर वन विभागाने या मांजर आणि बिबट्याला विहीरीतून बाहेर काढले. या बिबट्याला अभयआरण्यात सोडण्यात आले आहे.