nashik jilha bank

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या ठिकाणहून नवीन कर्ज घ्यायचे त्या बॅंकेतच रक्कम नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच सोसायटीने धनादेश वाटप करून आपले व्याज सुरू करून घेतले; पण शेतकऱ्यांना मात्र अजून पैसे मिळाले नाहीत.

येवला : महाविकास आघाडी सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी ( two lakhs)दिल्यानंतर अनेक शेतकरी ( farmers) नवीन पीक कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने कर्जाचे धनादेशही देण्यात आले आहेत. मात्र येवला तालुक्यातील नाशिक जिल्हा बँकेच्या (Nashik District Bank) पाटोदा शाखेत रोख रक्कमच ( amount ) शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना दररोज बँकेचा उंबरठा झिजवण्याची वेळ (mismanagement) आली असून नाशिक जिल्हा बँकेने त्वरित रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या ठिकाणहून नवीन कर्ज घ्यायचे त्या बॅंकेतच रक्कम नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच सोसायटीने धनादेश वाटप करून आपले व्याज सुरू करून घेतले; पण शेतकऱ्यांना मात्र अजून पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे ज्या दिवशी बँक शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम देईल, त्या दिवसापासून व्याजाची आकारणी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच कर्जाच्या रकमेसाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. विविध कार्यकारी सोसायट्यानी दिलेले धनादेश जिल्हा बँकेच्या पाटोदा शाखेत रकमेअभावी स्वीकारले जात नाही अन स्वीकारले तर रोख रकमे अभावी शेतकऱ्यांच्या कर्जाचे चेक वटत नसल्याने भांडवलाअभावी शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. याबाबत तालुक्यातील पाटोदा शाखेशी संपर्क केला असता केंद्रीय कार्यालयातून रक्कम प्राप्त न झाल्याने विविध कार्यकारी सोसायट्यांनी दिलेल्या धनादेशांची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली नसल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे.


नाशिक जिल्हा बँकेची पाटोदा येथे शाखा असून, परिसरातील विविध कार्यकारी सोसायट्याचा आर्थिक कारभार पाटोदा शाखेत आहे. यातील कातरणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने शेतकऱ्यांना कर्जापोटी धनादेश वितरीत केले आहेत. हे धनादेश पाटोदा शाखेत जमा केल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जाची रक्कम टाकली गेल्यानंतर शेतकरी ही रक्कम भांडवल म्हणून वापरतात.

अशाप्रकारे ०९ सप्टेंबर २०२० पर्यत दिले गेलेल्या धनादेशाची रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली आहे. मात्र १० सप्टेंबर पासून शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम दिली गेली नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. यात कातरणी विखरणी सह अनेक गावामधील शेतकरी दररोज बँकेत चकरा मारत असून बँकेत पैसेच नसल्याने रिकाम्या हाती परतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जाची रक्कम अदा करावी व अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गामधून व्यक्त होत आहे