Nashik The Covid Center building caught fire on the opening day; Citizens are frightened by the smoke

जेथे हे कोविड सेंटर आहे त्याच बिल्डिंगला भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे समजते. याठिकाणी सेंटरच्या खाली फर्निचरचे भले मोठे गोडावून आहे. यामुळे आग आणखी भडकली.

    नाशिक : उद्घाटना दिवशीच कोविड सेंटर बिल्डिंगला भीषण आग लागल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. चांदवड येथे हे कोवीड सेंटर नव्यानेच सुरू करण्यात आले आहे.

    जेथे हे कोविड सेंटर आहे त्याच बिल्डिंगला भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याचे समजते. याठिकाणी सेंटरच्या खाली फर्निचरचे भले मोठे गोडावून आहे. यामुळे आग आणखी भडकली.

    येथील रन वे हॉटेल ला देखील या आगीचा विळखा पडला आहे. हे खाजगी कोविड सेंटर आहे. येथे 15 तो 20 कोरोना रुग्ण उपचार घेत होते.
    आगीचे वृत्त कळताच मालेगाव, पिंपळगाव , चांदवड अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. विशेष म्हणजे या खाजगी कोविड सेंटरचे आजच उदघाटन होते. अशातच ही भीषण आग लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.