शास्त्रज्ञांपुढे आता नवे आव्हान : लस घेताच तयार झाला ‘मॅग्नेट मॅन’

लसीकरणाबाबत पहिल्यापासूनच सामान्य नागरिकाच्या मनात किंतू परंतु असल्याचे चित्र दिसत होते याबाबत प्रशासनाकडून नागरिकांत लस घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली व लसीकरण सुरळीत चालू झाले होते अशातच लस घेतल्यानंतर लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तु हाताला चिटकत आहेत असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत परिसरातील अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले मात्र लस सुरक्षित असल्याचा सांगितले.

  सिडको : ५ जून रोजी प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिडको भागातील एक ज्येष्ठ नागरिक अरविंद सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मानवी शरीराची रचना बघता वैद्यकीयदृष्ट्या चुंबकत्व येणे अशक्य मानले जात असले तरीही अनेकांनी प्रत्यक्ष जाऊन या प्रकाराची खात्री केली आहे. त्यामुळे विज्ञानापुढे एकप्रकारे हे आव्हानच उभे ठाकले असून सध्या नागरिकांमध्ये याबाबत मोठी चर्चा रंगल्या चे दिसून येत आहे.

  सिडकोतील शिवाजी चौक येथे राहणारे अरविंद जगन्नाथ सोनार (वय ७१ वर्ष) यांनी कोरोनाच्या कोविडशिल्ड लसीचा दोन दिवसापूर्वी दुसरा डोस हा खाजगी हॉस्पिटलमध्ये घेतला होता. दोन दिवस उलटल्यानंतर त्यांचा मुलगा जयंत हा बातम्या बघत असताना कोरोना बाबत लोखंडाच्या वस्तू चिटकत असल्याचे त्याला समजल्यावर त्याने वडिलांना तुमच्या हाताला वस्तूची चिटकतात का? म्हणून वस्तू लावून बघितल्या तर आश्चर्य असे की खरोखरच वडिलांच्या हाताला लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तू पैसे, चमचे चिटकत असल्याचे निदर्शनास आले. हाताला घाम आला असेल म्हणून त्यांनी हात धुतला, मात्र पुन्हा हाच प्रकार घडला. या घडलेल्या प्रकारामुळे परिसरामध्ये याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून घडलेल्या घटनेबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे.

  लसीकरणाबाबत पहिल्यापासूनच सामान्य नागरिकाच्या मनात किंतू परंतु असल्याचे चित्र दिसत होते याबाबत प्रशासनाकडून नागरिकांत लस घेण्यासाठी जनजागृती करण्यात आली व लसीकरण सुरळीत चालू झाले होते अशातच लस घेतल्यानंतर लोखंडाच्या व स्टीलच्या वस्तु हाताला चिटकत आहेत असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत परिसरातील अनेक डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले मात्र लस सुरक्षित असल्याचा सांगितले.

  मी पाच तारखेला कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला लस घेतल्यानंतर माझ्या हाताला स्टील च्या वस्तू चिटकत असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या समोर आला. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे.

  - अरविंद सोनार, ज्येष्ठ नागरिक, सिडको

  “लसीकरण घेतल्यानंतर स्टील अंगाला चिटकते. ही घटना कानी आली असून या घटनेला कोणताही मेडिकल बेस नाही.तर लस ही पूर्णपणे सुरक्षितच आहे. परंतु हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.”
  – डॉ. वैभव महाले, संचालक कल्पतरू हॉस्पिटल