lasalgaon onion auction

लासलगाव बाजार समितीत दोन सत्रात कांद्याचे लिलाव होत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकाळी साडे आठ वाजेपासून कांदा आलेल्या वाहनातील लिलाव संपेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली असता या मागणीचा विचार करत बाजार समिती प्रशासनाने आजपासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव घेण्याचा घेतला.

लासलगाव : कांद्याची निर्यातबंदी, वादळी पाऊस या संकटाने शेतकरी ग्रासला असतानाच आता लासलगावच्या बाजार (Lasalgaon market committee) आवारात आजपासून सकाळच्या सत्रातच कांद्याचे लिलाव (onion auction ) हाेणार असल्याने बळीराजावर आता नवे संकट उभे ठाकले (New crisis on farmers) आहे.

सध्या कांद्याला चांगला भाव मिळताे आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थाेडा का असेना पण दिलासा मिळत हाेता. मात्र आता काेराेनाचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. बाजार समितीत काेराेनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रातच (one session0 कांद्याचे लिलाव होणार आहे .

निफाड तालुक्यात कोरोनाबािधतांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारातील कांदा लिलाव पुकारणाऱ्या व्यापारी मदतनीसचा कोरोना संसर्ग झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बाजार समितीच्या तिघे कर्मचाऱ्यांना व कांदा निर्यातदार व्यापार्याला कोरोनाची लागण झाल्याने व्यापाऱ्यांसह कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

लासलगाव बाजार समितीत दोन सत्रात कांद्याचे लिलाव होत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकाळी साडे आठ वाजेपासून कांदा आलेल्या वाहनातील लिलाव संपेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली असता या मागणीचा विचार करत बाजार समिती प्रशासनाने आजपासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव घेण्याचा घेतला. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लिलावासाठी सकाळच्या सत्रात आणावा, असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.