नाशिकमध्ये नाईट कर्फ्य, मंत्री छगन भुजबळ यांची मोठी घोषणा

अमरावतीत लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर नाशिकमध्ये सोमवारपासून नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत घोषणा केली आहे. रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. लग्न सोहळ्यासाठी परवानगी बंधनकारक असेल. याशिवाय लग्नाला गर्दी करु नका, असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं.

    नाशिक : अमरावतीत लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर नाशिकमध्ये सोमवारपासून नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत घोषणा केली आहे. रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही संचारबंदी असेल. लग्न सोहळ्यासाठी परवानगी बंधनकारक असेल. याशिवाय लग्नाला गर्दी करु नका, असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं.

    नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासन अलर्टवर आहे. शहरात सहा ठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट पुन्हा सुरू होणार आहेत. तर, दोन कोव्हिड सेंटर देखील सुरू होणार आहेत.

    शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ केली जाणार आहे. मागील आठ दिवसातच शहरात झपाट्याने रुग्णसंख्या वाढली आहे.
    मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर शहरात धडक कारवाई सुरु आहे. नियम पाळा अन्यथा अजून कडक निर्बंधाना सामोरे जावे लागेल इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.